राज्यात पुन्हा तीन आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. डॉ. मंजिरी मधुसूदन मनोळकर या पुणे येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर होत्या.
त्यांची बदली पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे. शुभम गुप्ता यांची पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून मुंबई येथील उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तसेच, डॉ. भालचंद्र प्रताप चव्हाण यांची मुंबई येथील महसूल व वन विभागातील आपत्ती व्यवस्थापन संचालक पदावरून बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.