🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"मोठा खुलासा: MPSC अध्यक्षांच्या चौकशीवर कायदेशीर मर्यादा? विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पडद्यामागचा खेळ उघड!"

"मोठा खुलासा: MPSC अध्यक्षांच्या चौकशीवर कायदेशीर मर्यादा? विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पडद्यामागचा खेळ उघड!"


पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या दहा दिवसांपासून पुकारलेल्या आंदोलनाला रविवारी(ता.12 ऑक्टोबर) रात्री अखेर यश आलं. राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुणे गाठत आंदोलकांशी सर्व मागण्या मान्य करतानाच सरकारने पेपरफुटी प्रकरणात चौकशी समितीची नेमणूक केली आहे. 
या चौकशी समितीच्या सचिवपदी सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंची नियुक्ती करण्यात आली आहे. MPSC आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनीही सक्तीच्या रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता तुकाराम मुंढे हे भीमनवार यांची चौकशी करुच शकत नसल्याचा खळबळ उडवून देणारा दावा समोर आला आहे.
ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सोमवारी(ता.12 ऑक्टोबर)माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुण्यात रविवारी रात्री एमपीएससी अपध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या चौकशी समितीची घोषणा केली . तसेच आयएएस अधिकारी व एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविषयी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.




ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवेंद्रराजे यांच्या घोषणेनंतर धक्कादायक विधान केलं आहे. ते म्हणाले, तुकाराम मुंढे हे एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांची चौकशी करूच शकत नाही. एमपीएससी अध्यक्षांच्या चौकशीत मुंढेसाहेब असूच शकत नाहीत, त्यांची नियुक्ती अशाप्रकारे केली जाऊ शकत नाही. तसेच माजी न्यायमूर्तीही भीमनवार यांची चौकशी करू शकत नाही. यावेळी त्यांनी आर्टिकल 317 चा संदर्भ दिला.
ते म्हणाले, या कलमानुसार,राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाकडे एमपीएससी अध्यक्षांच्या चौकशीची शिफारस करावी लागते. राज्यपालांनी कोर्टाला त्यासंबंधीची विनंती करायची आहे आणि त्यांनी जर सर्वोच्च न्यायालयाने एमपीएससी अध्यक्षांच्या चौकशीला परवानगी दिली तरच ती होऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने नियुक्त केलेली समिती ही एमपीएससीच्या अध्यक्षांची चौकशी करू शकत नाही, असा मोठा दावा सदावर्ते यांनी केला आहे. मात्र,आपल ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याच बघायचं वाकून ही त्यांची खासियत आहे, असा हल्लाबोलही सदावर्ते यांनी केला. 


याबाबत गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची चौकशी राज्य सरकारने नियुक्त केलेली समिती करू शकत नाही. माझ्या माझ्यासमोर येऊन कोणीही कायदेशीर भाषा करू शकता, असं आव्हानही सदावर्ते यांनी दिलं आहे. या आंदोलनातून विद्यार्थ्यांना काहीही मिळणार नव्हतं, फक्त राजकारण मोठं झालं. तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची या आंदोलनातून मोठी फसवणूक करण्यात आली. महाराष्ट्र संविधान साक्षर असतानाही हा एक केविलवाणा प्रयत्न होता. परंतु, असा गंभीर आरोपही यावेळी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

याबाबत गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची चौकशी राज्य सरकारने नियुक्त केलेली समिती करू शकत नाही.  माझ्यासमोर येऊन कोणीही कायदेशीर भाषा करू शकता, असं आव्हानही सदावर्ते यांनी दिलं आहे. या आंदोलनातून विद्यार्थ्यांना काहीही मिळणार नव्हतं, फक्त राजकारण मोठं झालं. तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची या आंदोलनातून मोठी फसवणूक करण्यात आली. महाराष्ट्र संविधान साक्षर असतानाही हा एक केविलवाणा प्रयत्न होता. परंतु, असा गंभीर आरोपही यावेळी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
पुण्यात आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात चौकशी समिती नेमावी आणि त्यामध्ये आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी,ही मागणी उचलून धरली होती. ती आता राज्य सरकारने मान्य केली आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन एमपीएससी पेपरफुटी प्रकरणीच्या चौकशी समितीत तुकाराम मुंढे यांच्यासह अनेक दिग्गज अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली.
या समितीचे तुकाराम मुंढे हे समितीचे सचिव असतील असंही जाहीर केलं. मात्र,आता अशी माहिती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवेंद्रराजे यांच्या घोषणेनंतर धक्कादायक विधान केलं आहे. त्यांनी तुकाराम मुंढे हे एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांची चौकशी करू शकत नसल्याचं म्हटलं आहे.

विवेक भीमनवारांची मोठी घोषणा
एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे.एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल. जयहिंद...जय महाराष्ट्र...., अशी प्रतिक्रिया विवेक भीमनवार यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.