🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दीड कोटी महिना आणि २५o दिवस सुट्टी! सोन्यासारखी नोकरी मिळूनही माणसं मिळेनात; काय आहे यामागचं गुपित?

दीड कोटी महिना आणि २५o दिवस सुट्टी! सोन्यासारखी नोकरी मिळूनही माणसं मिळेनात; काय आहे यामागचं गुपित?


विचार करा जर तुम्हाला एखाद्या कंपनीने 365 दिवसांपैकी 250 दिवस सुट्टी अन् दीड कोटी रुपये महिना असलेल्या जॉबची ऑफर दिली तर? तुम्ही हसत हसत या जॉबची ऑफर स्विकाराल. असाच एक जॉब आहे, ज्यासाठी तुम्हाला कंपनी चक्क 250 दिवस सुट्टी अन् दीड कोटी रुपये महिना पॅकेजची ऑफर देण्यासाठी तयार आहे.

मात्र हा जॉब करण्यासाठी कोणीही तयार नाहीये. ही गोष्ट आहे नॉर्वेमधील एका 29 वर्षीय तरुणी अमाली लँडस्टँडची, अमाली इंजिनिअर आहे. अमाली गेल्या तीन वर्षांपासून इथे काम करत आहे. तिला कंपनीकडून वर्षाला 250 सुट्ट्या दिल्या जातात, तसेच तिला दर महिन्याला 130,000 युरो म्हणजे भारतीय चलनामध्ये तब्बल एक कोटी 41 लाख रुपये एवढी सॅलरी मिळते. आता तुम्ही या जॉबला ड्रीम जॉब म्हणाल. मात्र तरी देखील इथे कोणीही जॉबसाठी लवकर तयार होत नाही. मी देखील इथे जॉब करण्यासाठी फारसी उत्सुक नाही, असं अमाली म्हणते. 





डेन्मार्कच्या एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार अमाली लँडस्टँड ही गेल्या तीन वर्षांपासून नॉर्वेच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळ असलेल्या एका ऑइल रिगवर तेल उत्खनन केंद्रांवर काम करते. मात्र या कामासाठी प्रचंड शारीरिक ताकद, शिस्त आणि दीर्घकाळ कुटुंबापासून दूर राहण्याची तयारी या गोष्टींची आवश्यकता असते, त्यामुळे इथे लवकर कोणीही काम करण्यास तयार होत नाही, असं अमाली सांगते. या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा पुरवण्यात येतात. 

त्यांच्या राहण्याची देखील सोय केली जाते, त्यांना उत्तम जेवण मिळेल याकडे देखील विशेष लक्ष दिलं जातं. कामाचे तास संपल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी देखील विविध साधणे या ठिकाणी आहेत. मात्र तरी देखील कोणीही हा जॉब करण्यास तयार होत नाही, असं ही तरुणी म्हणते. या मागचं कारण सांगताना ती म्हणजे की एक तर दीर्घकाळ तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून वेगळं राहावं लागतं. काम अतिशय जोखमीचं असतं. इथे पूर्णपणे तुमच्या बुद्धीचा आणि सतर्कतेचा कस लागतो. छोटीशी चूक देखील तुमच्या जीवावर बेतू शकते. तसेच इथे एवढा एकटेपणा असतो, की लोक त्या एकांतवासालाच घाबरून जातात. त्यामुळे एवढी चांगली ऑफर असून देखील कोणताही कर्मचारी या ठिकाणी काम करण्यास तयार होत नाहीत, असं अमाली सांगते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.