🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

१ कोटी मतदारांच्या कपातावर काँग्रेसच्या बड्या नेत्याची धक्कादायक भूमिका; SIR प्रक्रियेचे थेट समर्थन!

१ कोटी मतदारांच्या कपातावर काँग्रेसच्या बड्या नेत्याची धक्कादायक भूमिका; SIR प्रक्रियेचे थेट समर्थन!


गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, निवडणूक आयोगाचा कारभार आणि एसआयआर प्रक्रियेविरोधात रान उठवले आहे. या मुद्द्यावरून १ नोव्हेंबररोजी दिल्लीत एका मोठ्या आंदोलनाची तयारीची काँग्रेसकडून सुरू आहे. 




मात्र दुसरीकडे कर्नाटक सरकारमधील बडे मंत्री असलेल्या सतीश जारकीहोळी यांनी आपलेच नेते आणि पक्षाच्या भूमिकेला छेद देणारं विधान केलं आहे. कर्नाटकमध्ये एसआयआर प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवण्यात आली आहे. आमचा विरोध कर्नाटकमधील एसआयआरला नव्हता तर बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांत ती ज्या प्रकारे राबवली गेली त्या पद्धतीला होता, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.




कर्नाटकमधील एसआयआर प्रक्रियेबाबत सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, कर्नाटकमध्ये एसआयआरचा विरोध करण्यात आला नव्हता. बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यांमध्ये ही प्रक्रिया राबवताना जे मुद्दे समोर आले, तेच विरोधाचे कारण ठरले. कर्नाटकमध्ये विरोध आणि लोकांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा चांगला परिणाम दिसून आला. तसेच यामुळे एसआयआरची प्रक्रिया ही योग्य पद्धतीने लागू करता आला. इतर राज्यांनीही ही प्रक्रिया योग्य पद्धतीने लागू केली पाहिजे होती, असे सतीश जारकीहोळी म्हणाले. 




यावेळी एसआयआर प्रक्रियेनंतर हटवण्यात आलेल्या सुमारे १ कोटी मतदारांबाबत विचारले असता सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, एसआयआरमधून ज्यांची नावं हटवण्यात आली आहेत, त्यांच्यापैकी अनेकांचा मृत्यू झालेला होता. तर अनेकजण दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले होते. तसेच काही जणांची मतदारयादीत एकापेक्षा अधिकवेळा नावनोंदणी झालेली होती. एसआयआरबाबत इतर राज्यांनीही कर्नाटकप्रमाणेच प्रकिया अवलंबवण्याची आवश्यकता होती, असा सल्लाही जारकीहोळी यांनी यावेळी दिला.

दरम्यान, सतीश जारकीहोळी यांनी कर्नाटकमधील एसआयआर प्रक्रियेचं समर्थन केल्यानंतर आता भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. आता काँग्रेसचे नेतेच हळुहळू ‘एसआयआर’बाबत राहुल गांधी यांची भूमिका उघड करत आहेत. कारण एसआयआरला विरोध करणं हे लोकशाही विरोधी आहे याची जाणीव त्यांना आहे, असे त्यांनी म्हटले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.