मानवतेच्या चिंध्या! पुण्यातील YCM रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात रंगली दारूची मैफील; धक्कादायक प्रकार उघड!
पिंपरी चिंचवड पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्या शवविच्छेदन विभागात मृतदेहांचं शवविच्छेदन केलं जातं, त्याच अतिसंवेदनशील ठिकाणी चक्क दारू पार्टी झाल्याचा आरोप आहे. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. टेबलवर दारूची बाटली, भरलेले पेग, चकना आणि जेवणाचं ताट स्पष्टपणे दिसत आहेत.
या प्रकारामुळे रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला रात्रभर थांबूनही दाखला मिळाला नाही. त्यानंतर कोणत्या कारणामुळे उशीर होतोय, हे पाहण्यासाठी ती व्यक्ती आत गेली, तेव्हा या दारू पार्टीचे बिंग फुटलं.
व्हिडीओमध्ये चेहरा दिसणारी व्यक्ती ही कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी वैभव म्हस्के आहे. तर दुसरी व्यक्ती कोण आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या व्यक्तींची ओळख आणि मद्यसेवनाबाबतचे आरोप अधिकृतरीत्या स्पष्ट होणं आवश्यक आहे. शवविच्छेदन विभागासारख्या संवेदनशील ठिकाणी असा प्रकार घडल्याचा आरोप गंभीर आहे.
त्यामुळे संबंधित व्यक्तींवर कारवाई होणार का? रुग्णालय प्रशासन या प्रकरणाची चौकशी करणार का? आणि व्हिडीओची सत्यता तपासून दोषींवर कारवाई केली जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता वायसीएम रुग्णालय प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
ही घटना तेव्हा उघडकीस आली, एक व्यक्ती मृत्यूचा दाखला घेण्यासाठी रुग्णालयात गेला होता. त्याला कर्मचाऱ्यांनी रात्रभर वाट पाहायला लावली. त्यावेळी त्या व्यक्तीने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. यात तो व्यक्ती वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करतोय. या व्हिडिओमध्ये, अनेक तास वाट पाहिल्यानंतर ती व्यक्ती झोपलेल्या कर्मचाऱ्याला विनवणी करत असल्याचं ऐकू येते.
दरम्यान हा व्हिडिओ रुग्णालयाच्या व्यवस्थापकांकडे देण्यात आलाय. त्यावर बोलताना YCM) रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता मारुती गायकवाड म्हणाले, "आम्हाला तो व्हिडिओ मिळालाय. आम्ही त्याकडे लक्ष देत आहोत. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू.
डॉ. गायकवाड यांनी सांगितलं की, नियमित अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे हे वैद्यकीय उपचार घेत आहेत. त्यातून ते सावरत आहेत. तात्पुरता कार्यभार स्वीकारलाय. परंतु सोफ्यावर झोपलेले दिसणारे वैद्यकीय अधिकारी कोण आहेत, याची मला कल्पना नाहीये. मी काही दिवसांपूर्वीच तात्पुरत्या स्वरूपात कार्यभार स्वीकारला आहे. मात्र, आम्ही या प्रकरणाची चौकशी करू आणि नेमके काय घडले आहे, ते शोधून काढू.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.