🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! सांगली जिल्हा मधयवर्ती बँकेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर ताकदीने उतरणार, राजकीय वातावरण तापले!

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! सांगली जिल्हा मधयवर्ती बँकेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर ताकदीने उतरणार, राजकीय वातावरण तापले!


सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचा उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने त्यांचा अर्ज अवैध ठरवला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पडळकर आता सांगली बँकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहेत.
 
काय होता नेमका वाद?
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यादरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जिल्हा सहकार उपनिबंधकांनी पडळकर यांचा अर्ज वैध ठरवला होता. परंतु, या निर्णयाविरोधात जतचे माजी आमदार तथा काँग्रेसचे नेते विक्रम सावंत आणि बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करून आक्षेप घेतला होता. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर कोल्हापूर खंडपीठाने गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला होता. या निर्णयामुळे पडळकरांना मोठा राजकीय धक्का बसला होता.
सर्वोच्च न्यायालयाचा पडळकरांना दिलासा

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अर्ज फेटाळल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागे न हटता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली. आज सर्वोच्च न्यायालयात या महत्त्वपूर्ण प्रकरणावर सुनावणी पार पडली. न्यायालयाने सर्व बाजू तपासून गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला.

निवडणुकीत रंगत वाढणार
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर गोपीचंद पडळकर यांच्यासमोर असलेला कायदेशीर अडथळा दूर झाला असून, त्यांचा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक लढवण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर आता सांगलीच्या सहकार वर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला असून, ही निवडणूक अतिशय अटीतटीची आणि रंगतदार होणार हे निश्चित मानले जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.