दुष्काळावर मात करण्यासाठी सावंतवाडीचा जलक्रांतीचा पॅटर्न! लोकसहभागातून वनराई व सिमेंट बंधारे बांधणारे सांगली जिल्ह्यातील ‘पहिले गाव’
मनसेच्या एकहाती सत्तेतून आणि थेट मार्गदर्शनातून सावंतवाडीत जलसंधारणाचा आदर्श प्रयोग
सांगली :-जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असून पाणीटंचाई आणि पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर रूप धारण करत आहे. अशा कठीण परिस्थितीत केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता, ग्रामपंचायत सावंतवाडीने लोकसहभागातून दुष्काळ निवारणाचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. सांगली जिल्ह्यात वनराई बंधारे आणि सिमेंट बंधाऱ्यांची लोकसहभागातून उभारणी करणारे सावंतवाडी हे पहिले गाव ठरले आहे.
विशेष म्हणजे, सावंतवाडी ग्रामपंचायतीवर सलग चौथ्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) एकहाती सत्ता आहे. पक्षसंघटना आणि स्थानिक नेतृत्वाच्या ठोस नियोजनातून तसेच थेट लक्ष देऊन करून घेतलेल्या कामांमुळे गावात जलसंधारणाची ही मोठी मोहीम यशस्वी रीतीने आकारास आली आहे.
गावात पडणारा पावसाचा थेंब अन् थेंब अडवून तो जमिनीत जिरवण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. गावातील पाणी उपलब्धता वाढवणे, जमिनीतील भूजलपातळी सुधारणे आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
श्रमदान आणि लोकवर्गणीचा नवा आदर्श
सावंतवाडीतील या जलसंधारण प्रयोगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गावकऱ्यांची एकजूट आणि मनसे नेतृत्वाचे योग्य मार्गदर्शन. गावाच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी गावकऱ्यांनी केवळ श्रमदानच केले नाही, तर उत्स्फूर्तपणे लोकवर्गणी काढून आर्थिक योगदानही दिले. गावकऱ्यांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी आणि एकजूट संपूर्ण जिल्ह्यासाठी कौतुकास्पद ठरत आहे.
इतर गावांसाठी प्रेरणादायी उपक्रम
दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी शासकीय योजनांबरोबरच गावपातळीवर लोकसहभागातून अशा प्रकारे जलसंधारणाची कामे होणे ही काळाची गरज आहे. मनसेच्या सत्ताकाळात सावंतवाडी ग्रामपंचायतीने राबवलेला हा यशस्वी प्रयोग सांगली जिल्ह्यातील इतर सर्व गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरणारा आहे.
या स्तुत्य उपक्रमासाठी पुढाकार घेणारे सावंतवाडीचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, श्रमदान करणारे नागरिक आणि लोकवर्गणीतून आर्थिक हातभार लावणारे दानशूर ग्रामस्थ या सर्वांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सांगलीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
"पाणी अडवा, पाणी जिरवा! गावाचा दुष्काळ, गावाच्या एकजुटीतून दूर करूया!"
– महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सांगली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.