🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेतीला मिळणार रोजगाराची जोड! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; १ लाख रिक्षांचे वाटप होणार

शेतीला मिळणार रोजगाराची जोड! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; १ लाख रिक्षांचे वाटप होणार


मुंबई : दुष्काळाचे  तालुके सरकारने घोषित केले आहेत, आता दु्ष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील आरटीओ विभाग हे महत्वाचं खातं आहे, ⁠हे खात शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेत आहे.⁠ 



एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी रिक्षा-टॅक्सी चालक महामंडळ सुरु केले होते. त्या माध्यमातून आता, राज्यातील ⁠अल्प आणि अत्यल्प भूधारकांना 1 लाख रिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक  यांनी दिली.

राज्य सरकारच्या या योजनेंतर्गत ⁠दरवर्षी 20 हजार रिक्षा दिल्या जाणार असून ⁠90 टक्के कर्ज आणि 10 टक्के अनुदानही शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच, या रिक्षाधारकांना आरटीओची फी माफ होणार आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेटला हा प्रस्ताव पाठवणार आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. 



राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना समावेश या योजनेत असेल. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी रिक्षांसाठी अर्ज ⁠केल्यानंतर म्हाडाच्या घरासारखी लॉटरी काढली जाईल. 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे, त्या दिवसापासून या रिक्षावाटप योजनेची सुरुवात करणार आहे. अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त रिक्षा सन्मान योजना सुरु करत आहोत, ही रिक्षा ⁠त्याच जिल्ह्यात शेतकऱ्यांना वापरता येईल, असेही प्रताप सरनाईक यांनी स्पष्टकेले.





➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.