🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"मुस्लिमांची घरं जाळू, बुलडोझर चालवू!"; मौलाना जर्जिस यांचं अत्यंत वादग्रस्त विधान, राजकीय वर्तुळात तीव्र संताप!

"मुस्लिमांची घरं जाळू, बुलडोझर चालवू!"; मौलाना जर्जिस यांचं अत्यंत वादग्रस्त विधान, राजकीय वर्तुळात तीव्र संताप!


उत्तर प्रदेशातील औरैया येथे मौलाना जर्जिस अन्सारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. योगी सरकारमध्ये उत्तर प्रदेशातीलमुस्लीम दहशतीखाली जगत असल्याचे म्हणत, पॅलेस्टाईन सारखी अवस्था होऊ देऊ नका.

मुस्लीम समाजाने एकत्र यायला हवे. कोणत्याही परिस्थितीत आगामी काळात हे सरकार पुन्हा सत्तेत येऊ देऊ नका, असे वादग्रस्त विधान जर्जिस अन्सारी यांनी केले आहे. एवढेच नाही तर, "योगी सरकार पुन्हा आल्यास यूपीमध्ये मुसलमानांची घरे जाळली जातील आणि बुलडोजर चालवले जातील, असेही जर्जिस यांनी म्हटले आहे.

CJP आंदोलनासंदर्भातही मोठा दावा - मौलाना जर्जिस म्हणाले, आपल्या आधीच्या वक्तव्यांवर कारवाई होणार होती, मात्र, मधेच CJP आंदोलन सुरू झाले. CJP चे जंतर-मंतरवरील आंदोलन आपल्यासाठी फारच चांगले ठरले. कारण, या आंदोलनामुळे आपली बातमी दबली आणि सर्व प्रकरण संपले, असे ते म्हणाले. याशिवाय, मुस्लिमांच्या चुकीने बंगाल लुटला गेला. 



आता तसे यूपीमध्ये होऊ द्यायचे नाही. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मौलाना जर्जिस यांनी यापूर्वीही प्रभू श्रीरामचंद्र आणि प्रभू श्रीकृष्ण यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्ये केली होती, यानंतर, हिंदू संघटनांनी त्यांच्याविरुद्ध FIR ही दाखल केली होती. यापूर्वी त्यांनी मुस्लिमांना बंगालमध्ये स्थलांतरित होण्याचा सल्लाही दिला होता.



कडक कारवाई आणि गुन्ह्या दाखल करण्याची मागणी - मौलाना जर्जिस यांच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय आणि धार्मिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. अयोध्येचे महंत विष्णू दास यांनी मौलाना जर्जिस अन्सारी हे मुसलमानांची दिशाभूल करून त्यांना भडकावत असल्याचा आरोप केला आहे. 



मौलाना देशविरोधी असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विविध हिंदू संघटनांनीही या विधानावर तीव्र आक्षेप घेतला असून, वारंवार समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, अशा व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.