🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बेकायदेशीर कॉल डिटेल्स आणि टॉवर लोकेशन प्रकरण: पोलीस दलातच खळबळ!

बेकायदेशीर कॉल डिटेल्स आणि टॉवर लोकेशन प्रकरण: पोलीस दलातच खळबळ!


माजी पोलीस कॉन्स्टेबलच्या अरेरावीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; चौकशीदरम्यानच तक्रारदाराला जीवे मारण्याच्या धमक्या!


सांगली :- पोलिसांचे रक्षणकर्ते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्याच खाकी वर्दीतील एका महिला कर्मचाऱ्याने थेट गुंडांशी हातमिळवणी करून नागरिकांचे खाजगी आयुष्य धोक्यात आणल्याचा एक अत्यंत गंभीर प्रकार सांगली जिल्ह्यात उघडकीस आला आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबल तेजस्विनी कदम यांनी तक्रारदार श्री. अमोल बबन जाधव यांचे बेकायदेशीरपणे कॉल डिटेल्स (CDRs) आणि टॉवर लोकेशन काढून ते रेकॉर्डवरील गुंडांच्या हातात सुपूर्द केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, जत पोलीस उपअक्षकांसमोर झालेल्या चौकशीत त्यांनी स्वतः हा गुन्हा केल्याची कबुलीही दिली आहे.




​चौकशी सुरू असतानाच गुंडांकडून जिवावर बेतणारा कट?

​याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी, जत उपविभाग यांच्याकडे सखोल चौकशी सुरू असून, अर्जदारास दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी चौकशी कामी हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, अर्ज केल्याच्या आणि चौकशी सुरू असल्याच्या रागापोटी महिला पोलीस कॉन्स्टेबल तेजस्विनी कदम यांनी आपल्या माहेर व सासरकडील (शिरढोण व लांडगेवाडी, ता. कवठेमहांकाळ) आणि स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या इसमांना हाताशी धरल्याचा आरोप आहे.

​तक्रारदाराने दिलेल्या अर्जानुसार, २० ते २५ गुंडांना कवठेमहांकाळ येथील जुन्या एस. टी. स्टँड परिसरात आणून तक्रारदार अमोल जाधव यांना संपवण्यासाठी दिवस-रात्र शोधमोहीम राबवली जात आहे. स्थानिक नागरिकांनी वेळीच सावध केल्यामुळे अमोल जाधव यांना जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात आश्रय घ्यावा लागला आहे.





​खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याची भीती

​महिला पोलीस कर्मचारी तेजस्विनी कदम यांचे नातेवाईक आणि परिसरातील गुंडप्रवृत्तीचे लोक, अमोल जाधव यांच्यावर संपूर्ण केस मागे घेण्यासाठी तीव्र दबाव आणत आहेत. तसेच तक्रार मागे न घेतल्यास त्यांच्यावर एखादा खोटा गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.

​विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे न्याय मागण्यासाठी धाव

​सदर प्रकरणाची चौकशी पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी, यासाठी अर्जदार अमोल बबन जाधव यांनी थेट कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सविस्तर अर्ज केला आहे. तेजस्विनी कदम यांची कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातून तात्काळ अन्यत्र बदली करावी.




​
चौकशी प्रभावित होऊ नये म्हणून कठोर प्रशासकीय पावले उचलली जावीत. जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन तात्काळ पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे, अशी विनंती या अर्जात करण्यात आली आहे. खाकी वर्दीचा गैरवापर करून गुंडांना पाठीशी घालणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला सुरुंग लावणाऱ्या अशा पोलिसी वर्तनामुळे सांगली पोलीस दलात तीव्र संतापाची लाट पसरली असून, या प्रकरणावर वरिष्ठ अधिकारी नेमकी काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

​"माझे कॉल डिटेल्स बेकायदेशीरपणे काढून गुंडांना दिले गेले आहेत. चौकशी सुरू असताना मला व माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला जात आहे. मला त्वरित पोलीस संरक्षण मिळावे आणि संबंधित महिला कर्मचाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी."

 

— श्री. अमोल बबन जाधव (तक्रारदार)

​

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.