पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखाली ११ नोव्हेंबर २०२६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत देशाच्या सांस्कृतिक वारशापासून ते शेतकरी, तरुण आणि महिला उद्योजकांपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित पाच मोठ्या प्रस्तावांना मंजुरी देण्याल आली.
या निर्णयांवर एकूण ७७,१०१ कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या निर्णयांमध्ये जगातले सर्वात मोठे संग्रहालय उभारणं, नोएडा मेट्रोचा विस्तार, खत अनुदान आणि उद्योजकांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड यांचा समावेश आहे.
HDFC Bank चा ग्राहकांना झटका! MCLR मध्ये १५ बेसिस पॉइंट्सची वाढ; आता होम लोन महागणार? केंद्रीय मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
१. युगे युगीन भारत संग्रहालयासाठी ३,२३० कोटी रुपये
भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जगासमोर मांडण्यासाठी दिल्लीत 'युगे युगीन भारत' हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. यासाठी ३,२३० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. दिल्लीतल्या ऐतिहासिक नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक या परिसरात हे संग्रहालय विकसित केलं जाईल.
२. नोएडा मेट्रो विस्ताराला मंजुरी
नोएडा सेक्टर ५१ ते ग्रेटर नोएडा सेक्टर ४ दरम्याने मेट्रो रेल्वे लिंक विकसित करण्याच्या प्रस्तावासा मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी २,३९० कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
३. शेतकऱ्यांसाठी ६२,३७० कोटींचे खत अनुदान
रब्बी हंगामातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खत अनुदानापोटी ६२,३७० कोटी रुपये मंजुर करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खत उपलब्ध करून देण्यास मदत होईल. शेतीचा उत्पादन खर्च नियंत्रित ठेवणं हा या निर्णयाचा महत्वाचा उद्देश आहे.
४. मुद्रा योजनेसाठी ५,००० कोटींचा क्रेडिट गॅरंटी फंड
तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ५,००० कोटी रुपयांचा क्रेडिट गॅरंटी फंड मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
५. महिला आणि SC-ST उद्योजकांसाठी ४,१११ कोटी
स्टँड-अप इंडिया योजनेअंतर्गत महिला तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ४,१११ कोटी रुपयांचा क्रेडिट गॅरंटी फंड मंजूर करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.