🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत नागरिकांच्याच हस्ते विकासकामांचा नारळ फुटला! रमामाता नगरात हॉटमिक्स डांबरी रस्त्याच्या कामाचा धडाक्यात शुभारंभ​

सांगलीत नागरिकांच्याच हस्ते विकासकामांचा नारळ फुटला! रमामाता नगरात हॉटमिक्स डांबरी रस्त्याच्या कामाचा धडाक्यात शुभारंभ


​सांगली :- प्रभागातील रस्ते सुव्यवस्थित आणि दर्जेदार व्हावेत या उद्देशाने रमामाता नगर परिसरातील लुबना स्टोअरसमोरील गल्लीमध्ये हॉटमिक्स डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, कोणत्याही बड्या राजकीय आविर्भावापेक्षा स्थानिक नागरिकांप्रती आदर व्यक्त करत, या रस्त्याच्या कामाचा नारळ परिसरातील नागरिकांच्याच शुभहस्ते वाढवण्यात आला.

​या महत्त्वाकांक्षी विकासकामासाठी नगरसेवक फिरोज पठाण यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नांमुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला या गल्लीतील रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. हॉटमिक्स डांबरीकरणामुळे नागरिकांना खड्डेमुक्त आणि चांगल्या दर्जाचा रस्ता उपलब्ध होणार असून परिसराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे.




​या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेविका सोनल पाटील-सावर्डेकर, स्मिता ताई यमगर, तरुण सहकारी पप्पू चव्हाण, विक्रम पाटील-सावर्डेकर, युसुफ पठाण, राजू यमगर, ॲड. शहबाज नाईकवाडी, निसार पठाण, अनीस भाई बागवान, फजल पठाण यांच्यासह प्रभागातील नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्याच हस्ते आपल्या गल्लीतील कामाचा शुभारंभ झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नगरसेवक फिरोज पठाण व सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.