🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राजकीय वर्तुळात खळबळ! केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरींनी सोडली राज्यसभेची जागा; पडद्यामागे नेमकी काय चाललंय?

राजकीय वर्तुळात खळबळ! केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरींनी सोडली राज्यसभेची जागा; पडद्यामागे नेमकी काय चाललंय?


गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये विविध मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्यामुळे दिल्लीत राजकारण चांगलंच तापलेलं आहे.



असं असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

मध्य प्रदेशातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्यानंतर आता मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या आपल्या सदस्यत्वाचा शनिवारी राजीनामा दिला आहे. कारण काही दिवसांपूर्वी हरदीप सिंह पुरी यांची मध्य प्रदेशातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली होती. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. राज्यसभेकडून या संदर्भात एक निवेदन जारी करण्यात आलं आहे.




त्यानुसार, मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा राजीनामा सभापतींनी आज (१४ नोव्हेंबर) स्वीकारला आहे. राज्यसभेच्या बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की, 'उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य हरदीप सिंह पुरी यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा राज्यसभेच्या सभापतींनी १४ नोव्हेंबर २०२६ रोजी स्वीकारला आहे.'


दरम्यान, भाजपाने केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी दिली होती. त्यानंतर या निवडणुकीत गेल्या आठवड्यात राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी इतर दोन उमेदवारांचे अर्ज फेटाळले गेले होते. त्यामुळे हरदीप सिंह पुरी हे एकमेव उमेदवार राहिले होते, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे.


हरदीप सिंह पुरी यांचा २५ नोव्हेंबरला संपणार होता कार्यकाळ

तामिळनाडूमध्ये भाजपाला बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी १४ ऑक्टोबर रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली गेली. 



हरदीप सिंह पुरी यांचा उत्तर प्रदेशातील सध्याचा राज्यसभेचा कार्यकाळ २५ नोव्हेंबर रोजी संपणार होता. त्यामुळे पक्षाने केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.