🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​२ मुली झाल्याच्या रागातून पत्नीला विहिरीत ढकलून हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेप; ईश्वरपूर सत्र न्यायालयाचा निकाल

​२ मुली झाल्याच्या रागातून पत्नीला विहिरीत ढकलून हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेप; ईश्वरपूर सत्र न्यायालयाचा निकाल


ईश्वरपूर :- दोन मुली झाल्याच्या आणि मुलगा झाला नाही या रागातून पत्नीला पहाटे फिरायला नेण्याचा बहाणा करून विहिरीत ढकलून तिचा खून करणाऱ्या आरोपी कौस्तुभ कृष्णराव सरनौबत याला ईश्वरपूर सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त साधा कारावास, तसेच खोटी तक्रार नोंदवल्याप्रकरणी (भा.द.वि. कलम १७७) ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा मा. सत्र न्यायाधीश क्र. २ आर. बी. रोटे यांनी दिली.

​काय आहे घटना?

​आरोपी कौस्तुभ सरनौबत याला पत्नीपासून दोन मुली झाल्या होत्या, मात्र मुलगा झाला नाही याचा राग त्याच्या मनात होता. याच रागातून १८ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटे त्याने पत्नीला फिरायला जाण्याच्या बहाण्याने नेले आणि विहिरीत ढकलून तिचा खून केला. कृत्य लपवण्यासाठी आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन अपघात झाल्याचा बनाव रचत खोटी तक्रार नोंदवली होती. 




​याप्रकरणी मृत महिलेचे भाऊ मिलिंद नानासो भोसले (वय २८, रा. न्यू पॅलेस हेड पोस्ट ऑफिस जवळ, रमणमळा, कोल्हापूर) यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून आरोपीविरुद्ध भा.द.वि. कलम ३०२, ४९८ (अ) आणि १७७ अंतर्गत गुन्हा (गु.र.नं. ५७५/२२) दाखल करण्यात आला होता.

​परिस्थितीजन्य पुरावा अन् १० साक्षीदार

​या गुन्ह्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. मात्र, तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी अत्यंत बारकाईने तपास करत भक्कम परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आणि न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. 




सेशन केस क्र. १२७/२०२२ च्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी मिलिंद भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एन. राऊत आणि तपासी अंमलदार शशिकांत चव्हाण यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.

​विशेष सरकारी वकिलांचा युक्तिवाद

महाराष्ट्र सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. विशाल नरेंद्र बामणे यांनी काम पाहिले. त्यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना मांडले की, "अशा गंभीर आणि क्रूर गुन्ह्यातील आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजात न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल." हा युक्तिवाद आणि मांडलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.




​पोलीस यंत्रणेचे यश

​कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार नसताना आरोपीला कायद्याच्या कचाट्यात पकडण्यासाठी तपासी अधिकारी शशिकांत चव्हाण यांच्यासह दप्तरी अंमलदार सपोफौ शरद जाधव, पोहेकॉ अरूण कानडे (बॅच नं. १३४८) आणि पोहेकॉ प्रशांत देसाई (बॅच नं. १९८७) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ​तसेच पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अरुण पाटील, पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील आणि सपोनि मुद्दसर सादिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सहा. पोलीस उपनिरीक्षक शरद जाधव, पोहवा उत्तम शिंदे, तसेच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पैरवी अंमलदार पोना प्रमोद आपटे (बॅच नं. २१४५), पोकॉ सुनील पाटील (बॅच नं. १५९४) व पोहेकॉ संदीप शेटे (बॅच नं. ११८२) यांनी सरकार पक्षाला मोलाची मदत केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.