🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"बॉलीवूडच्या 'व्हिलन'ने रोखला विजय मल्ल्याचा रस्ता! साम्राज्य वाचवण्यासाठी खर्च केले तब्बल ४० कोटी; ईशान्य भारतात घडला मोठा थरार!"

​"बॉलीवूडच्या 'व्हिलन'ने रोखला विजय मल्ल्याचा रस्ता! साम्राज्य वाचवण्यासाठी खर्च केले तब्बल ४० कोटी; ईशान्य भारतात घडला मोठा थरार!"



ज्येष्ठ अभिनेते डॅनी डेन्झोंगपा यांनी १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला सहाय्यक कलाकार म्हणून आपल्या आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. मग त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने नकारात्मक भूमिकांमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

डॅनी यांचा जन्म सिक्कीममध्ये झाला. सैन्यात अधिकारी व्हायचं त्यांचं स्वप्न होतं. मात्र, १९६० च्या दशकात चीनबरोबरचा तणाव आणि युद्धाची भीषणता पाहिल्यानंतर, त्यांच्या आईने त्यांना सैन्यात न जाण्याची विनंती केली. डॅनी यांनी आईच्या विनंतीला मान दिला आणि संगीत शिकायचं ठरवलं.

डॅनी डेन्झोंगपा यांनी ‘एफटीआयआय’मधून अभिनयाचा कोर्स केला, तिथे संगीतही शिकवले जात होते. नंतर ते अभिनयात आले आणि कमी कालावधीतच सिक्कीम राज्यातून येऊन देशभरात लोकप्रियता मिळवणारे पहिले अभिनेते ठरले. जसजशी प्रसिद्धी मिळू लागली, तसतशी त्यांना आपल्या घराची आठवण येऊ लागली. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी वर्षातील कमीत कमी सहा महिने सिक्कीममध्ये घालवण्याचा निर्णय घेतला. याच काळात त्यांनी सिक्कीममध्ये बीअरची कंपनी सुरू केली, ती आज भारतातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक आहे.

डॅनी यांनी ४० वर्षांपूर्वी सुरू केलेली बीअर कंपनी

डॅनी यांनी सिक्कीममधील त्यांच्या गावाच्या युक्सोम या नावावरून कंपनीचं नाव ‘युक्सोम ब्रुअरीज’  ठेवलं. ही कंपनी त्यांनी १९८७ साली सुरू केली. 




सुरुवातीला हा एक लहान उद्योग होता, यातून स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि सिक्कीमच्या अर्थव्यवस्थेला मदत झाली. पुढे जाऊन ही कंपनी भारतातील तिसरी सर्वात मोठी आणि ईशान्य भारताची सर्वात मोठी बीअर बनवणारी कंपनी बनली.

विजय मल्ल्याला रोखण्यासाठी डॅनी यांनी ४० कोटी रुपये खर्च केले

२००५ मध्ये डॅनी यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यास सुरुवात केली. त्यांनी ओडिशामध्ये ‘डेन्झोंग ब्रुअरीज’ची सुरुवात केली आणि चार वर्षांनंतर, २००९ मध्ये आसाममधील ‘रायनो एजन्सीज लिमिटेड’ ही कंपनी खरेदी केली. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या २००९ मधील एका रिपोर्टनुसार, डॅनी यांनी रायनो एजन्सीज लिमिटेड ही कंपनी तब्बल ४० कोटी रुपयांना खरेदी केली होती. त्या काळात विजय मल्ल्याची ‘युनायटेड ब्रुअरीज’ कंपनी ईशान्य भारतातील बाजारपेठेत शिरण्याचा प्रयत्न करत होती. डॅनी यांना हा भाग आपल्या ताब्यात ठेवायचा होता, कारण जर मल्ल्याची कंपनी तिथे आली, तर आपलं नुकसान होऊ शकतं याची कल्पना त्यांना होती. 




मल्ल्याची युनायटेड ब्रुअरीज ही कोट्यवधी डॉलरची मोठी कंपनी होती, तर डॅनी यांची कंपनी त्या मानाने स्थानिक पातळीवर काम करत होती. डॅनी यांनी व्यवसायाचा विस्तार करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना बॉलीवूडमध्ये ३० वर्षे झाली होती. पण अभिनयापेक्षा त्यांच्या बीअर व्यवसायातून त्यांची जास्त कमाई होत होती. २००९ मध्ये ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना, या व्यवसायाबद्दल ते म्हणालेले, “व्यवसाय खूप छान सुरू आहे. आता सिक्कीममध्ये माझ्या तीन कंपन्या आहेत. तीच माझी खरी रोजीरोटी आहे.” ‘सेलिब्रिटी नेट वर्थ’नुसार, डॅनी यांची सध्याची एकूण संपत्ती ८० कोटींपेक्षा जास्त आहे.


उन्हाळ्यात फक्त ३ महिने मुंबईत शूटिंग करतात डॅनी

२०१८ मध्ये ‘स्क्रोल’ला दिलेल्या मुलाखतीत डॅनी यांनी सांगितलं होतं की, त्यांना उन्हाळ्यात मुंबईत राहणं आवडत नाही. त्यामुळे ते फक्त नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांतच मुंबईत शूटिंग करतात. व्यवसायामुळे आर्थिक स्थिरता आल्याने ते हा निर्णय घेऊ शकले. “मी मुंबईत फक्त हिवाळ्यात, म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यानच शूटिंग करेन, ही माझी अट असते. मुंबईतील उन्हाळा खूप भयंकर असतो. इतका अस्वस्थ करणारा असतो की तुमचे केसही व्यवस्थित राहत नाहीत. 




घाम येते आणि ते पडद्यावरही दिसून येतं. कधीकधी तर मला अजिबात काम करावं वाटत नाही. मी आनंद घेत हळूहळू काम करतो. मी रविवारी शूटिंग करत नाही. मी माझ्या मनाचं ऐकतो. मी कोणतेही प्लॅन करत नाही,” असं ते म्हणाले होते. गेल्या दोन दशकांत, डॅनी यांनी ‘एंथिरन’, ‘बेबी’, ‘नाम शबाना’, ‘ऊंचाई’ असे मोजकेच चित्रपट केले आहेत. 9000+ मॅगझीन्स एक्स्प्लोर करा

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.