जगातील सगळ्यात श्रीमंत लोकांपैकी एक आणि सगळ्यात जास्त गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख होतो तेव्हा वॉरेन बफेट यांचं आवर्जून समोर येतं. ९५ वर्षांचे वॉरेन बफेट जगातील सगळ्यात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत.
त्यांना ‘ओरेकल ऑफ ओमाहा’ नावनेही ओळखलं जातं. साधारण १३.३ लाख कोटी रूपये संपत्तीचे मालक बफेट यांना शेअर बाजारातील मोठी हस्ती मानलं जातं. पण सध्या ते एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. असा दावा करण्यात येतोय की, गेल्या ४८ वर्षांपासून ते साधं पाणी पित नाहीयेत. त्याऐवजी ते कोका-कोला पिणं पसंत करतात. मजेदार बाब म्हणजे ज्या कंपनीच्या ड्रिंकचे ते फॅन आहेत, त्या कंपनीत त्यांचे शेअर्सही आहेत.
डिनरदरम्यान बिल एकमॅनने सांगितली सवय
वॉरेन बफेट यांच्या या सवयीचा खुलासा दिग्गज हेज फंड मॅनेजर बिल एकमॅन यांनी एका पॉडकास्टमध्ये केलाय. ते म्हणाले की, एकदा त्यांनी बफेट यांना आपल्या घरी डिनरसाठी बोलवलं होतं. यावेळी त्यांनी बफेट यांना साधं पाणी किंवा सोडा ऑफर केला होता.
पण बफेट यांनी दोन्ही पिण्यास नकार दिला. यावेळी बफेट बिल यांना म्हणाले की, 'बिल, मी गेल्या ४८ वर्षांपासून पाणी प्यायलेलो नाही'. त्यांचं हे उत्तर ऐकून एकमॅन थक्क झाले. हा खुलासा केवळ एकमॅन यांनीच नाही तर बफेट यांची मुलगी सूजी बफेटने सु्द्धा एका डॉक्युमेंट्रीमध्ये केला आहे.
पाण्याऐवजी रोज पितात कोकचे ५ कॅन
कुणालाही प्रश्न पडू शकतो की, बफेट पाणी पित नसतील, तर त्यांची तहान कशी भागते? रिपोर्ट्सनुसार, त्याना कोका-कोला पिणं फार आवडतं. ते रोज साधारण ५ कॅन कोका-कोला पितात. खासकरून त्यांना चेरी कोक आवडतं. बफेट त्यांच्या या सवयीबाबत गंमतही करतात. ते म्हणतात की, त्यांचा शरीराचा मोठा भाग हा कोका-कोलाने तयार झालाय.
आधी पेप्सी प्यायचे
कोका कोलाचे फॅन होण्याआधी बफेट हे पेप्सी प्यायचे. त्यांच्या या सवयीमुळे त्यांचा मुलगा त्यांना 'पेप्सी वॉरेन' म्हणायचा. पण पुढे त्यांची आवड बदलली. खरंतर त्यांचे एक शेजारी कोका-कोला कंपनीत अधिकारी होते. त्यांनी बफेट यांना चेरी कोक सॅम्पल पाठवलं. बफेट यांना याची टेस्ट इतकी आवडली की, ते रोज हेच पितात.
कोका-कोलामध्ये मोठी गुंतवणूक
बफेट यांचा संबंध कोका-कोलाच्या ड्रिंकसोबतच नाही तर कंपनीसोबतही आहे. १९८८ मध्ये त्यांची कंपनी बर्कशायर हॅथवेने कोका-कोलामध्ये मोठी गुंतवणूक केली. कंपनीने साधारण १.३ अब्ज डॉलर खर्च करून कोका-कोलाचे ४० कोटी शेअर खरेदी केले.कोका-कोलामध्ये केलेल्या गुंतवणुकीचा फायदा बर्कशायर हॅथवेला डिविडेंडच्या रूपात मिळतो. बफेट यांना कोका-कोलाकडून दरवर्षी साधारण ७,१०० कोटी रूपये मिळतात. म्हणजे एकीकडे बफेट यांना कोकची टेस्ट आवडते, तर दुसरीकडे त्यांना कंपनीकडून मोठा फायदाही मिळतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.