🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"शरद पवारांना मोदींचा फोन हा केवळ एक स्टंट!" पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा; राजकीय वर्तुळात भूकंप!

"शरद पवारांना मोदींचा फोन हा केवळ एक स्टंट!" पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा; राजकीय वर्तुळात भूकंप!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती, तेव्हा त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना फोन करून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

तसेच पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू तुमचे आशीर्वाद असू द्या असं म्हटलं होतं. शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी ही माहिती दिली होती.

दरम्यान, यावरून वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यावर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकमतच्या मुलाखतीत बोलताना महत्वाचं भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून विचारपूस करणं म्हणजे शिष्टाचाराचा आणि चौकशीचा एक भाग आहे’, असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांच्या विरोधात आणि केंद्र सरकारच्या विरोधात इंडिया आघाडी एकवटली आहे. मात्र, या दरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्या तब्येतीच्या पार्श्वभूमीवर त्यांना फोन करतात व मोदी म्हणतात की सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू तुमचे आशीर्वाद असू द्या. मग यावर काँग्रेस म्हणून तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न मुलाखतीत त्यांना विचारण्यात आला.

यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “हा शिष्टाचाराचा आणि चौकशीचा एक भाग आहे. कोणी आजारी असताना त्यांची चौकशी करणं हा एक शिष्टाचाराचाच भाग आहे असं मला वाटतं. आता त्यात ते पुढे म्हटले की आम्ही बघतो वैगेरे, म्हणजे त्यांचा असा सल्ला आहे की आता तुम्ही जास्त दगदग करू नका. यापेक्षा याकडे वेगळ्या अर्थाने पाहणं योग्य नाही”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत शंका आहे का?

तुम्हाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत शंका आहे का की ते एवढ्या ठामपणे काँग्रेसबरोबर आहेत. त्यामुळे ते भाजपाबरोबर जाणार नाहीत. या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की, “या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकतो. पण मी देणार नाही”, असं म्हणत चव्हाण यांनी यावर अधिक भाष्य करणं टाळलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.