Big Breaking! परमजीत धनखडांवर १५ गोळ्यांचा वर्षाव! टेक महिंद्राच्या एशिया हेडची पार्किंगच्या क्षुल्लक वादातून निर्घृण हत्या; ९ गोळ्या थेट शरीरात घुसल्या!
फरिदाबाद: हरियाणातील फरिदाबादमध्ये टेक महिंद्राचे एशिया हेड परमजीत धनखड यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शेजारी राहणाऱ्या मोनू शर्मा याने शुक्रवारी रात्री आपल्या परवानाधारक पिस्तुलातून त्यांच्यावर सुमारे 15 राउंड गोळीबार केल्याचा आरोप आहे.
परमजीत यांना 9 गोळ्या लागल्या असून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार दोन्ही कुटुंबांमध्ये पार्किंगमध्ये श्वानाला शौचास नेण्यावरून आणि गाडी पार्क करण्यावरून वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री परमजीत जिममधून घरी परतले. त्यावेळी त्यांनी आपल्या ठरलेल्या पार्किंगच्या जागेवर उभी असलेली मोनूची गाडी हटवण्यास सांगितले. यावरून मोनूने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
या घटनेनंतर आरोपी कुटुंबासह फरार झाला. परमजीत यांचा मुलगा शौर्य याने पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना घटनास्थळावरून गोळ्यांची रिकामी काडतुसे आढळली. परमजीत सिंगापूरमध्ये राहत होते. ते 5 नोव्हेंबर रोजी भारतात आले होते. 24 नोव्हेंबर रोजी त्यांना भाच्याच्या लग्नाला उपस्थित राहायचे होते.
4 दिवसांपूर्वीही झाला होता वाद
परमजीत यांचे कुटुंब सेक्टर-21सी येथील 641 क्रमांकाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहते. तर आरोपी मोनूचे कुटुंब तिसऱ्या मजल्यावर राहते.
सूरजकुंड पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रल्हाद यांच्या माहितीनुसार, 4 ते 5 दिवसांपूर्वीही मोनू आणि शौर्य यांच्यात भांडण झाले होते. मात्र त्यावेळी हा वाद मिटवण्यात आला होता.
मुलाच्या तक्रारीवरून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल
सूरजकुंड पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रल्हाद यांनी सांगितले की, परमजीत यांचा मुलगा शौर्य याच्या तक्रारीवरून मोनू शर्मा ऊर्फ मोहन, त्याची पत्नी दिव्या, मुलगा मयंक, मुलगी नैना आणि भाऊ हेतराम या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमजीत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.