🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

असा दिवाळी बोनस कधीही पाहिला नसेल! जेव्हा मालकाने कर्मचाऱ्यांच्या हातात दिली 'ही' भेट...

असा दिवाळी बोनस कधीही पाहिला नसेल! जेव्हा मालकाने कर्मचाऱ्यांच्या हातात दिली 'ही' भेट...


जयपूर: दिवाळीत बोनस मिळणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र राजस्थानमधील एका उद्योगपतीने यंदा असे काही केले की, संपूर्ण देशभरात त्यांच्या मोठ्या मनाची चर्चा होत आहे.


राजस्थानमधील बिकानेरचे रहिवासी असलेले आणि सुरतमध्ये कापडाचा मोठा व्यवसाय करणारे उद्योगपती रामस्वरूप मूंड यांनी यंदाच्या दिवाळीत आपल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही साधीसुधी भेट दिली नाही.

दिवाळी फक्त माझ्याच घरी का साजरी व्हावी

या अनोख्या भेटवस्तूमागे रामस्वरूप मूंड यांची जी विचारसरणी आहे, ती थेट मनाला भिडणारी आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांनी अत्यंत साधेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, हा कोणताही दिखावा नाही. नोकरी करणे आणि मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे म्हणजे काय असते, याची त्यांना जाणीव आहे.

त्यांनी आपल्या 50 कर्मचाऱ्यांपैकी प्रत्येकाला 1 लाख रुपये रोख आणि खास भेटवस्तू देऊन सर्वांची मने जिंकली.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. लोक त्यांच्या या कृतीचे कौतुक करताना म्हणत आहेत, पैसेवाले तर अनेक असतात, पण एवढं मोठं मन असलेला मालक क्वचितच पाहायला मिळतो.

रामस्वरूप यांनी सांगितले की, त्यांच्याकडे वाटण्यासाठी पैशांची कोणतीही मोठी थैली नाही. तर ही त्यांच्या मेहनतीचा आणि माणुसकीचा एक भाग आहे. त्यांच्या मते, दिवाळीची लक्ष्मी आणि आनंद केवळ त्यांच्या स्वतःच्या घरापुरता मर्यादित राहू नये. त्यांच्यासोबत दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरातही पैशांचा वर्षाव व्हायला हवा. ते आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या टीमला देतात. स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगतो, पण खऱ्या माणुसकीचा अर्थ सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यात आहे, असे त्यांचे मत आहे.

कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले

जेव्हा एखादा मालक आपल्या कर्मचाऱ्यांना नोकर न समजता कुटुंबातील सदस्य मानून एवढा सन्मान देतो, तेव्हा तिथे काम करण्याची प्रेरणाच बदलून जाते. सेठ रामस्वरूप यांच्या या कृतीमुळे त्यांचा संपूर्ण कर्मचारी वर्ग भावूक झाला.

गेल्या वर्षीही त्यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या कर्मचाऱ्यांना पैसे वाटले होते. त्यावेळीही या घटनेचा व्हिडिओ पाहून आणि लोकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.