🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; प्रॅक्टिकल आणि लेखी परीक्षा 'या' तारखेपासून

मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; प्रॅक्टिकल आणि लेखी परीक्षा 'या' तारखेपासून


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 



पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बोर्डाच्या अधिकृत परिपत्रकानुसार, यंदाच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे.

बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक-

लेखी परीक्षा- सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ ते गुरुवार, १८ मार्च २०२७ या कालावधीत पार पडतील.

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा- बुधवार, २० जानेवारी २०२७ ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७ या दरम्यान आयोजित केले जाईल.




दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक-

लेखी परीक्षा- सोमवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२७ ते सोमवार, १५ मार्च २०२७ या कालावधीत घेतली जाईल.

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा- गुरुवार, २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत संपन्न होईल.


संपूर्ण वेळापत्रक कुठे पाहता येणार?

नियोजित कालावधीमध्ये आयोजित केलेल्या परीक्षांचे तारीखनिहाय सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 



विद्यार्थी व पालकांनी या अधिकृत वेबसाईटवरून आपले वेळापत्रक डाऊनलोड करून त्यानुसार परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.