भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक, आदिवासी अस्मितेचे प्रतीक आणि 'धरती आबा' म्हणून ओळखले जाणारे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार गाडगीळ यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला उजाळा दिला. ते म्हणाले की, "भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेला लढा हा भारतीय इतिहासातील एक सुवर्णपान आहे. अत्यंत कमी वयात त्यांनी आदिवासी बांधवांमध्ये स्वाभिमान जागवून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रचंड ताकद निर्माण केली.
समाजहितासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान आणि त्यांचे क्रांतिकारी विचार आजही आपल्या सर्वांना समाजकार्याची नवी प्रेरणा देतात. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल."या अभिवादन प्रसंगी भाजपाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा शहर सरचिटणीस तथा नगरसेवक विश्वजीत पाटील, उपाध्यक्ष विजय साळुंखे, सुनील भोसले, मंडलध्यक्ष रवींद्र वादवणे, राहुल नवलाई, नगरसेवक युवराज गायकवाड यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयघोषात त्यांना आदरांजली वाहिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.