🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेतकऱ्यांना दिलासा! वारणा साखर कारखान्याकडून प्रतिटन ४,२०० रुपयांचा घसघशीत ऊस दर जाहीर

शेतकऱ्यांना दिलासा! वारणा साखर कारखान्याकडून प्रतिटन ४,२०० रुपयांचा घसघशीत ऊस दर जाहीर


वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसास प्रतिटन ४,२०० रुपये ऊस दर देण्याची घोषणा आमदार डॉ.विनय कोरे यांनी सोमवारी केली.



स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी झालेल्या चर्चेप्रमाणे पहिला हप्ता प्रतिटन ३९०० रुपये, गळीत हंगाम समाप्तीनंतर १०० रुपये आणि अंतिम हप्ता २०० रुपये देणार असल्याचे जाहीर केले. चालू हंगामातील ऊस दर निश्चित करताना शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देण्यात आले आहे. जाहीर केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत पैसे मिळणार असून, एकूण प्रतिटन ४२०० रुपये दर देण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. कोरे यांनी स्पष्ट केले. 




या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सर्व ऊस उत्पादक सभासद, वाहतूकदार मालक आणि कारखान्याचे कामगार यांनी उत्तम समन्वय व सहकार्य राखून आपला सर्व ऊस वारणा कारखान्यालाच गळितासाठी देऊन कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आ. कोरे, उपाध्यक्ष प्रतापराव पाटील आणि कार्यकारी संचालक शहाजीराव भगत यांनी केले आहे.

कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एफआरपीपेक्षा अधिकचा आणि समाधानकारक दर देऊन वारणा कारखान्याने पुन्हा एकदा शेतकरीहिताचा निर्णय घेण्याची आपली परंपरा जपली आहे, 




असे मत प्रशासनाने व्यक्त केले. "शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोल देणे हीच आमची प्राथमिकता आहे. एफआरपीपेक्षाही जास्त आणि वाजवी दर देऊन आम्ही सभासदांचा विश्वास सार्थ ठरवला आहे." ​

जाहीर दर: ₹४,२०० प्रतिटन

​फायदा: हजारो ऊस उत्पादक सभासद व पुरवठादार शेतकऱ्यांना थेट लाभ

​उद्देश: वाढता उत्पादन खर्च लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सक्षम आर्थिक पाठबळ देणे




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.