अनाथ व गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी साठी व्यक्तिचित्र पेंटिंग प्रदर्शन.. 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2026 पाच दिवस मराठा समाज हॉल एस टी स्टँड रोड सांगली येथे संपन्न होत आहे.... मी विश्वव्याख्यात रांगोळीकार चित्रकार आदम अली मुजावर.. प्राध्यापक अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी येथे कार्यरत असून. माझे शिक्षण (ए.टी.डी /जी. डी. आर्ट / ए. एम./डिप.ए.एड ) झाले आहे रांगोळी कलेचे. माध्यमातून 27 वर्ल्ड बुक रेकॉर्ड केले आहेत...
महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार ही मिळाला आहे. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील 100 पेक्षा जास्त पुरस्कारही मिळाले आहेत... पैसा हा माणसाला जगवतो व कलाही माणसाला जगायला शिकवते याची अनुभूती वेळोवेळी माझ्या आयुष्यात आलेली आहे. गेली तीन दशके रांगोळी लोककलेचे जतन जागतिक पातळीवर कसे होईल याचे सातत्याने प्रयत्न करत आहे.
रांगोळीच्या माध्यमातून व्यक्ती चित्र अति भव्य स्वरूपाचे रेखाटू शकते हे मी जगाला दाखवून दिले आहे.. त्यानंतरच मोठमोठे व्यक्तीचित्र रांगोळ्या रेखाटण्याची प्रथा या देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा सुरू झाली आहे... रांगोळीतील व्यक्ती चित्ररे काढण्याची सुरुवात माझ्या हातूनच झाली व 2002साली मी तो विश्व विक्रम प्रस्थापित केला व जगातला एकमेव मानकरी ठरलं... या तीन दशकात अनेक विश्वविक्रम प्रस्थापित केले आहे.. व जगातल्या अनेक वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नावाची नोंद ही झाली आहे...
कलेच्या माध्यमातून अनेक प्रबोधनात्मक व सामाजिक कार्य केले आहे... यातीलच एक विशेष बाब म्हणजे 2020 साले कोरोनाच्या महामारी महामारीत सारे जग थांबले असताना मी मात्र थांबलो नाही.. नऊ महिन्याच्या बंद कालावधीमध्ये अनेक महामानवांच्या व्यक्तिरेखा पेंटिंग च्या माध्यमातून रेखाटल्या व त्यातून मिळणारा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोरणासाठी 51 हजार चा दिला व मानवतेचा कर्तव्य जपण्याचा एक छोटासा प्रयत्न केला... गेली अनेक वर्ष अशा कार्यात माझा हिरीरीने सहभाग असून.. आजही तोच प्रयत्न आहे...
कोरोनाच्या माहामारीत जो अनुभव घेतला त्याच अनुभवाच्या जोरावर गेली पाच वर्षे सातत्याने मी कॅनवास पेंटिंग चे काम करत आहे... त्याचाच एक संग्रह करून अनाथ व गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी आज हा एक वेगळा उपक्रम आहे.. सांगली जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय व्यक्तींची. तैल चित्रे मी रेखाटन केली आहेत... व यानिमित्ताने त्याची प्रदर्शन करत आहे.. या पेंटिंग च्या माध्यमातून मिळणारा सर्व निधी गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी खर्च करणार आहे.... महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडवणीस. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील... मराठा आरक्षणाचे जनक मनोज दादा जरांगे पाटील. सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल दादा पाटील. माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार.. आमदार जयंतरावजी पाटील. प्रदेशाध्यक्ष सुमित दादा कदम. आमदार सुधीर दादा गाडगीळ.आमदार इद्रिसभाई नाईकवाडी. आमदार सुरेश भाऊ खाडे. मुख्याध्यापक डी. एन. पाटील सर उद्योजक सी.आर. सांगलीकर. आर्किटेक्ट प्रमोद चौगुले. आमदार गोपीचंद पडळकर. आमदार सुहास भैया बाबर.. पृथ्वीराज बाबा पाटील. आमदार रोहित दादा पाटील. जिल्हाध्यक्ष मोहन वनखंडे सर उद्योजक प्रवीण शेठ लुंकड माजी आमदार विक्रम दादा सावंत.
हृदय रोग तज्ञ डॉक्टर रियज मुजावर. माझी सरपंच रामचंद्र दादा वाघमोडे.नगरसेवक अमोल भैया बाबर.सामाजिक कार्यकर्ते अशोकराव शिंदे.उद्योजक दिनेश जाधव उद्योजक तात्यासाहेब खोत. युवा नेते एस आर बापू पाटील.... अशा अनेक व्यक्तींची चित्र रेखाटली असून. गेली पाच वर्षे या कामासाठी मी मेहनत घेत आहे.. वेगवेगळ्या साईज मध्ये ही पेंटिंग असून यांच्या व्यक्तिरेखा हुबेहूब व बोलक्या रेखाटले आहेत. चेहऱ्यावरील भाव, रंग संगती,त्यांचा स्वभाव, त्यांचा पेरावा, रंगसंगतीचा सखोल पूर्वक अभ्यास करून ही चित्रे पूर्ण केली आहेत.. 15 ते 20 दिवसाचा कालावधी एका पेंटिंग साठी लागला असून कॅनवास व तैल रंगाचा वापर केला आहे. निवडलेल्या आकारात त्याची रचना उत्कृष्ट पद्धतीने केली असून. चेहऱ्यावरील भाव,छाया प्रकाश, उत्कृष्ट रंगसंगतीचा वापर करून चित्रे थ्रीडी पद्धतीने रेखाटली आहेत.. व्यक्ती चित्रातील भाव टिपत असताना खूप मेहनत घेतली आहे व खूप मनापासून काम केले आहे..
राजकीय व्यक्तिमत्त्वांची चित्रे ही केवळ चेहरे टिपणारी पोर्ट्रेट्स नसतात; ती त्यांच्या सार्वजनिक प्रवासाची, विचारांची आणि कार्याची दृश्य नोंद असतात. कॅनव्हासवरील प्रत्येक रेषा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एखादी छटा अलगद उलगडते, तर रंग त्यांच्या नेतृत्वाची ऊर्जा आणि काळाशी असलेले नाते व्यक्त करतात.
कलाकाराच्या कुंचल्यातून आकार घेताना हे चेहरे केवळ ओळखीचे राहत नाहीत, तर त्यांच्या मागची भूमिका, संघर्ष आणि प्रभावही जाणवू लागतो. प्रकाश-छायांचा सूक्ष्म वापर त्यांच्या स्वभावातील गांभीर्य, संवेदनशीलता किंवा दृढता अधोरेखित करतो. ही चित्रे म्हणजे इतिहास, समाज आणि कलेचा एकत्रित संवाद आहे—जिथे राजकीय व्यक्तिमत्त्व कॅनव्हासवर नव्या अर्थाने उभे राहते. कारण उत्तम कलाकृती व्यक्तीचे रूप दाखवण्यापलीकडे जाऊन तिच्या कार्याची आणि काळावर उमटलेल्या ठशाची जाणीव करून देते.
व्यक्तिचित्र हा माझा आवडता विषय असून... हे प्रदर्शन माझ्यासाठी विशेष आहे.. पेंटिंग क्षेत्रामध्येही मला राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.. ही कला जोपासत असताना ग्रामीण भागातील कलाकार कला रसिक व कलावंत.. कलेचा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने कसा निर्माण होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.. सर्वसामान्य व ग्रामीण भागातील कलावंत कसा उत्कृष्ट निर्माण होईल व या स्पर्धेच्या युगामध्ये तो कसा टिकेल यासाठी शैक्षणिक व सामाजिक कार्य करत आहे.. मी कार्य करत असलेल्या अजितराव घोरपडे विद्यालयातील अनेक विद्यार्थी कला क्षेत्रामध्ये चमकले असून जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत पारितोषिक ही मिळवली आहेत...गेलो अनेक वर्षे विद्यार्थ्यांना मोफत.. मार्गदर्शन, कार्यशाळा, प्रात्यक्षिक वर्ग, व्याख्याने देऊन. हजारो विद्यार्थी कला प्रवाहामध्ये आणले आहेत व त्यांना एक उदरनिर्वाचे साधन तयार करून दिले आहे.. याचा मला सार्थ अभिमान आहे.. आज ही सातत्याने हे कार्य सुरू आहे.. चित्रकला, रांगोळी, अक्षरलेखन, हस्तकला, क्लोथ पेंटिंग ग्लास पेंटिंग, कारविन, मातकाम,कागदकाम, क्लोथ पेंटिंग कॅनव्हास पेंटिंग अशा प्रकारच्या कला मुलांचे मध्ये जोपासण्याचा प्रयत्न आहे...
कलेच्या दुनियेतील कलंदर व्यक्तिमत्व ज्यांच्या नावानेच या देशाला रांगोळी कलेची वेगळ्या रूपाने ओळख झाली व एक सामान्य लोककलेला जागतिक दर्जा मिळाला .आदम अली सुलतान मुजावर छोट्याशा आरग या ग्रामीण भागात जन्म .सांगली जिल्हा तसा सर्वदृष्टीने मागासलेला, ऐतिहासिक दृष्ट्या महाराष्ट्रात नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे .त्याच मातीचा गंध पुन्हा यांच्या हातून दरवळला व सातासमुद्रापलीकडे गेला. व्यक्ती जरी सामान्य असली तरी कर्तुत्वाने जीवनात इतिहास घडवू शकते याची प्रचिती नक्कीच आदम आली यांना पाहिल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. शेतकरी कुटुंबात जन्म .ग्रामीण भागातील अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी या शाळेत नोकरी करत करत कलेची उत्तुंग भरारी. भारतीय संस्कृतीच्या अनेक कलापैकी रांगोळी ही एक लोककला आहे पण ज्याची ओळख आज जगात रांगोळी म्हणून जगभर झालेली आहे, आज जे स्थान या लोककलेला मिळालेला आहे ते एकमेव ,अद्वितीय कार्य करणारे रांगोळीकार चित्रकार आदम अली यांच्यामुळे.
विसाव्या शतकात रांगोळीची ओळख ही फक्त दरवाजा पुरती स्वागत ,समारंभ, क्षणिक आनंद मिळवण्यासाठी झाली असून, छोटी छोटी विविध माध्यमातून ठराविक मर्यादेपर्यंत व ठरलेल्या चौकटीतच रेखाटली जाते. भारताच्या अनेक राज्यात माध्यमे वेगळी असली तरी रांगोळी ही मर्यादा पलीकडे जाऊ शकली नाही. रांगोळीला पौराणिक व अध्यात्मिकतेची जोड असली तरी रांगोळीला वेगळ्या रूपात वेगळ्या पद्धतीने वेगळ्या कल्पनेतून मांडण्याचा अनेक व्यक्तींनी प्रयोग केला ही असेल केलाही आहे. पण आदम अली यांनी मात्र भारतीय लोककलेला दर्जा जगभर आहेच तरीही रांगोळी या लोककलेच्या माध्यमातून अद्वितीय कार्य करून जागतिक दर्जा मिळवून देणारे सामान्यातले असामान्य व्यक्ती आहेत. त्यांचे मूळ कार्य चित्रकलेतील असले तरी त्यांनी रांगोळीतून व्यापक कार्य केले आहे .छोट्या रांगोळ्या रेखाटत, रेखाटत त्यांनी विश्वविक्रम प्रस्थापित केला.
त्यांची दखल गिनीज बुकने सुद्धा घेतली .मी ही पुस्तकातून वाचलो आहे ऐकूनही होतो की ,रांगोळीतून डिझाईन, निसर्ग चित्र, व्यक्तीचित्र, छोटी छोटी प्रदर्शने यातून रांगोळीचे मूळ स्वरूप बदलण्याच्या मार्गस्थ आहे .परंतु आदमली मुजावर यांच्या अनेक न्युज पेपर टिव्ही चैनल वरून बातमी ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला की, अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते, हे आदम अली यांनी सिद्ध केले .आदम अली मुजावर यांनी डिसेंबर २००२ मध्ये नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. चित्रही अशा स्वरूपाचे निवडले की आपल्या देशाच्या उच्च संस्कृतीचे दर्शन त्यातून घडेल व ते अख्ख्या जगाला कळेल .महाभारतातील गीता उपदेश युद्धभूमी व भगवान श्रीकृष्ण अर्जुन ला उपदेश करत आहेत. कर्मणीय वाधिकारस्ते मा फलेशू कदाचन, नेमकी याचे फलित आदम अलीच्या ही जीवनात झाले असावे, या ग्रंथातील चित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटन करून त्यांनी भारतीय लोक कला व भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे, हे कलेच्या माध्यमातून जगाला सिद्ध करून दाखवले. ही रांगोळी त्यांनी अविश्रांत सलग ७२ तास एकट्याने 2000 चौरस फूट रेखाटन करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊन ते कलाक्षेत्रातील विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय ठरले. रांगोळी या लोककलेला जागतिक दर्जा मिळवून देणारे पहिले भारतीय कलाकार असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .
रांगोळी या लोककलेला जगाच्या इतिहासात अजरामर करणारे अवलिया म्हणजेच (ॲडम)आहेत .यावरच न थांबता जवळजवळ 27 वर्ड बुक रेकॉर्ड रांगोळ्या रेखाटन करून विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत. अनेक वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना सन्मानित केले आहे. एका छोट्या गावातून इतके महान कार्य करू शकतो .हे आमच्यासाठी भूषणा वहआहे. अभिमानास्पद आहे. नि गर्विय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची समाजात ओळख असून चित्र व रांगोळीच्या माध्यमातून समाजकार्यात ही त्यांचे नाव लौकिक आहे. याचीच दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना सन 2017 मध्ये आदर्श कला शिक्षक राज्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .त्यांच्या कलेचा व कार्याचा ठसा भारतीय तरुण पिढीवर असून अनेक गावात, शाळा, कॉलेज ,महाविद्यालयात प्रदर्शन ,स्पर्धा ,कार्यशाळा मार्गदर्शन शिबिरे होत आहेत .इतकेच नव्हे तर लहान समारंभ उत्सव कोणत्याही आनंदाच्या क्षणी रांगोळी रेखाटन हे अविभाज्य घटक बनले आहे . याचे एकमेव श्रेय हे आदम अली मुजावर यांना जाते. त्यांच्या या कार्याचा ठसा साऱ्या भारतीय रांगोळी कला कारावर दिसून येतो .आज अनेक गावापासून ते शहरापर्यंत रांगोळीचे रेकॉर्ड पाहायला व ऐकायला मिळतात ते सर्व ह्या व्रत हस्त कलाकारामुळेच.....
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.