🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

न्यायालयीन इतिहासातील सर्वात मोठा धक्का! एकाच ईमेलने संपूर्ण महाराष्ट्र हादरला; सांगलीसह ५ हून अधिक जिल्हा न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांची प्रचंड पळापळ​

न्यायालयीन इतिहासातील सर्वात मोठा धक्का! एकाच ईमेलने संपूर्ण महाराष्ट्र हादरला; सांगलीसह ५ हून अधिक जिल्हा न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांची प्रचंड पळापळ


​राज्यात आज एकच खळबळ उडाली आहे. मुंबईसह राज्यातील तब्बल पाचहून अधिक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची थेट धमकी एकाच ईमेलद्वारे मिळाल्याने प्रशासन आणि पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. या एकाच 'पॅटर्न'च्या ईमेलमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील न्यायालयीन कामकाज ठप्प झाले असून न्यायालय परिसरात नागरिकांची व कर्मचाऱ्यांची प्रचंड पळापळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

​सांगली जिल्हा न्यायालयात प्रचंड भीतीचे वातावरण

​सांगली जिल्हा न्यायालयालाही ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच वकील, पक्षकार आणि न्यायाधीशांनी तातडीने इमारतीबाहेर धाव घेतली.




सांगली न्यायालयात लोकांची मोठी पळापळ झाली असून पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन रिकामा केला आहे. सध्या सांगलीत पोलीस आणि बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून (BDDS) कसून तपासणी सुरू आहे.

​राज्यात कुठे-कुठे मिळाल्या धमक्या?

सातारा जिल्हा न्यायालय: ईमेल मिळताच तातडीने इमारत रिकामी करून सर्व कामकाज थांबवण्यात आले.

​मुंबई (दिंडोशी कोर्ट): दिंडोशी न्यायालयात बॉम्बची बातमी पसरताच पोलिसांनी संपूर्ण इमारतीची झडती घेतली. सुदैवाने तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.



​ठाणे, बीड, हिंगोली व सोलापूर: या सर्व जिल्हा व सत्र न्यायालयांनाही बॉम्बच्या ईमेलने लक्ष्य करण्यात आले. हिंगोली आणि सोलापूर न्यायालयात तातडीने सुरक्षा दलाने ताबा घेत परिसर रिकामा केला. 

​परभणी व इतर जिल्हे: खबरदारीचा उपाय म्हणून परभणीसह इतर न्यायालयांच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे.




सायबर पोलिसांकडून तपास वेगात

​एकाच वेळी राज्यातील अनेक महत्त्वाच्या न्यायालयांना आलेला हा धमकीचा मेल कोणत्या ठिकाणाहून आणि कोणी पाठवला, याचा शोध आता सायबर पोलीस घेत आहेत. सर्व ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथके (BDDS) आणि डॉग स्कॉडच्या साहाय्याने तपासणी सुरू असून नागरिकांनी व पक्षकारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


​

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.