किती दिवसांनी नवीन फोन घ्यावा?
एका ठराविक वेळेनंतर तुम्हाला नक्की फोन बदलण्याची आवश्यकता असते. त्यावेळी तुम्ही नवीन फोन घ्यायला हवी. एक फोन तुम्ही दोन ते तीन वर्ष आरामात वापरू शकता. ज्या फोनमध्ये मंथली सिक्युरिटी पॅच लवकर मिळत नाही असे फोन लवकर आउटडेटेड होतात. त्यांचा डेटा हॅक होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे तुम्ही असे फोन तातडीने बदलणं आवश्यक आहे.
तुमच्या फोनमध्ये सतत मेमरी फुल होण्याचा धोका असेल तर तुम्हाला नवीन फोन घेणं आवश्यक आहे. कमीत कमी 64 GB स्टोअरेज असलेल्या फोनची निवड करा. जेव्हा बॅटरी खूप लवकर संपते याचा अर्थ असा होतो की जुना फोन वापरणं थांबवलं पाहिजे. वापरताना फोनची बॅटरी 12 तास किंवा त्याहून अधिक काळ चालू असेल तर ठीक आहे. पण जर ते कमी असेल तर तुमच्या बॅटरीचे आरोग्य कसे आहे ते पाहावे लागेल. जर तो नवीन फोन असेल, तर बॅकग्राउंडमध्ये अनेक गोष्टी चालू असू शकतात, त्यामुळे बॅटरी खर्च होत आहे. जर तुमचा फोन जुना झाला असेल आणि बॅटरीची समस्या येत असेल तर याचा अर्थ नवीन फोन घ्यावा.
तुमच्या फोनमध्ये सतत अॅप क्रॅश होत असतील तर तुम्ही नवीन फोन घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या फोनमध्ये सुरळीत सुरू असतील तर नवीन फोन घेण्याची आवश्यकता नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
