राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली, दि. 21, : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी हे आज शुक्रवार, दि. 21 जुलै 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 21 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजता पुणे येथून सांगलीकडे प्रयाण. रात्री 9 वाजता सांगली येथे आगमन व मुक्काम.
शनिवार, दि. 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता मिरज तालुक्यातील बेडग येथे भेट व ग्रामस्थांसोबत बैठक. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत बैठक. दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद, स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली. दुपारी 1.50 वाजता पुणेकडे प्रयाण.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
