🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलांना विष देत जोडप्याची आत्महत्या

मुलांना विष देत जोडप्याची आत्महत्या

भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. रातीगढ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या नीलबड वसाहतीमधील शिवविहारमध्ये पती-पत्नीचे मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत सापडले. तर त्यांची दोन मुलेदेखील मृतावस्थेत आढळली. 

त्यांना विष देऊन संपवण्यात आल्याची शक्यता आहे. दाम्पत्याने आधी मुलांना विष दिले. त्यानंतर गळफास लावून घेतला. कर्जाच्या ओझ्याखाली अडकल्याने कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. पोलिसांना घरात एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात ऑनलाईन लोनमध्ये अडकून कर्जबाजारी झाल्याचा उल्लेख आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर पहाटे ४ वाजता भाचीला सुसाईड नोट पाठवली

भूपेंद्र विश्वकर्मा यांनी गुरुवारी पहाटे ४ वाजता त्यांची भाची रिंकी विश्वकर्मा हिला व्हॉट्सअ‍ॅपवर सुसाईड नोट पाठवली होती. तसेच पत्नी आणि दोन्ही मुलांसोबत सेल्फी पाठवला. या फोटोला कॅप्शन लिहिले - हा माझा शेवटचा फोटो आहे. सकाळी सहा वाजता रिंके यांनी हे फोटो आणि सुसाईड नोट पाहिली आणि कुटुंबीयांना माहिती दिली. रिंकी मंडीदीप येथील धाग्याच्या कारखान्यात काम करते.

सर्व मोबाइल संपर्कांना व्हिडिओ पाठवला - मृताचा भाऊ

पंकज विश्वकर्मा यांनी सांगितले, भूपेंद्र हा मोठ्या वडिलांचा मुलगा होता. त्याच्यासोबत सायबर गुन्हा घडला आहे. त्याचा मोबाइल आणि कंपनीकडून मिळालेला लॅपटॉप हॅक करण्यात आला. त्याच्या मोबाइलमध्ये असलेल्या सर्व संपर्क क्रमांकांवर त्याचे एडिट केलेले अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्यात आले. धमकावून पैशांची मागणी करत होते. भावाने 4 ते 5 दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅप स्टेटसही टाकले होते की हा मेसेज माझ्याकडून पाठवला जात नाही. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा.

दोन-तीन दिवसांपूर्वी आमचं बोलणं झालं.तो अस्वस्थ होता. त्याच्याकडे 17 लाखांची मागणी करण्यात आली होती. म्हणायचे इतके पैसे कुठून देणार. त्याने तिन्ही बँक खाती रिकामी केल्याचे भावाने सांगितले होते. सगळे पैसे काढले. 7-8 जुलै रोजी सायबर सेलमध्ये तक्रार करण्यासाठी गेले होते.

काकू म्हणाल्या- सुनेने सांगितले होते १७ लाख रुपये मागत आहेत

भूपेंद्रची काकू लीला विश्वकर्मा म्हणाली, 'कोणालाही काहीच माहिती नव्हते. काल सुनेने मला सांगितले की कोणीतरी 17 लाख रुपये मागत आहे. न दिल्यास घर उद्ध्वस्त करू, असे तो म्हणत आहे. खूप आनंदी कुटुंब होतं. मोठा मुलगा ऋतुराज हा नीलबाड येथील शारदा विद्या मंदिर शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होता. धाकटा मुलगा ऋषिराजचे शालेय शिक्षण अजून सुरू झाले नव्हते. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.