Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नितेश राणे शेंबडा पोरगा, चांगला पोलीस अधिकारी असता तर त्याला फटकावलं असतं: इम्तियाज जलील

नितेश राणे शेंबडा पोरगा, चांगला पोलीस अधिकारी असता तर त्याला फटकावलं असतं: इम्तियाज जलील
 

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आगपाखड केली आहे. नितेश राणे हा शेंबड पोट त्याला महत्व देऊ नका.चांगला पोलीस अधिकारी असता त्याला मारलं असतं.

राज्यात काही कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? नितेश राणेंपेक्षा  घाण मी बोलू शकतो. तो सकाळी उठला की हिंदू हिंदू करतो. त्याला पोलिसांनी थोबाडीत मारली पाहिजे होती, असे इम्तियाज जलील  यांनी म्हटले.

नितेश राणे यांनी मंगळवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरुन पोलीस अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो. पोलिस ठाण्यात लव्ह जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या तीन तासात पोलिस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू, असे नितेश राणे यांनी म्हटले होते.

नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. मात्र, बुधवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतान पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचे समर्थन केले होते. पोलिस अधिकाऱ्यांसंदर्भातल्या वक्तव्यावर आपण कायम असल्याचे एबीपी माझाशी बोलताना नितेश राणे यांनी सांगितले. पीडित मुलींच्या आईवडिलांचे ऐकून घेणार नसेल, न्याय मिळवून देण्यापेक्षा पीडितांची चौकशी करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेणे माझे कर्तव्य असल्याचे नितेश राणे म्हणाले. विरोधकांच्या इशाऱ्यावर जे अधिकारी काम करणार असेल तर अशा अधिकाऱ्यांनी आपली वर्दी वाचवून दाखवावी, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. ज्या अधिकाऱ्यांमुळे गृह खाते बदनाम होत आहे, त्यांची तक्रार गृहमंत्र्यांकडे करुन कारवाईची मागणी करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.