Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! भीक म्हणून ५ रुपये दिल्याने भिकारी संतापला, रागात चाकू काढला अन्...

धक्कादायक! भीक म्हणून ५ रुपये दिल्याने भिकारी संतापला, रागात चाकू काढला अन्...
 

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये भिकाऱ्याने भीक न मिळाल्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिजनौरच्या नई बस्तीमध्ये एका भिकाऱ्याने एका व्यक्तीकडे भीक मागितली, पण त्याने भीक दिली नाही. यावर भिकाऱ्याने त्या व्यक्तीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याला त्या व्यक्तीने विरोध केला असता भिकाऱ्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नसीम असं या भिकाऱ्याचे नाव आहे. नसीमला एका महिलेने पाच रुपये दिले असता भिकाऱ्याने त्याला दहा रुपये देण्यास सांगितले. त्यानंतर बिजनौर जिल्ह्यातील नई बस्ती 24 मध्ये रस्त्यावर लोकांकडून भीक मागताना चांगलाच वाद निर्माण झाला. भीक न देणाऱ्यांना तो शिवीगाळ करू लागला. नई बस्ती-24 येथील रहिवासी तेथून जात होते. भिकाऱ्याने त्यांच्याकडे भीक मागितली आणि त्यांनी नकार दिल्याने त्या भिकाऱ्याने त्यांनाही शिवीगाळ केली. त्याने विरोध केला असता भिकाऱ्याने त्या व्यक्तीवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर आजूबाजूचे लोक घाबरले आणि काहींनी पोलिसांना माहिती दिली. 

घटनास्थळी उपस्थित लोकांनी हल्ला करणाऱ्या भिकाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी व्यक्तीला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी सांगितले की, हल्लेखोर हा अपंग भिकारी असून तो किरतपूर परिसरातील रहिवासी आहे. 

पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून भाजी कापण्याचा चाकू जप्त केला आहे, जो त्याने हल्ल्यात वापरला होता. भिकाऱ्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जात असून त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर कठोर कारवाई केली जाईल. या घटनेने नई बस्ती-24 आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक लोक आता घाबरले असून पोलिसांकडून या प्रकरणात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.