Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केशर पान मसाला कंपनीच्या मालकाच्या पत्नीचा भीषण अपघातात मृत्यू, आग्रा एक्स्प्रेस वेवर झाली दुर्घटना

केशर पान मसाला कंपनीच्या मालकाच्या पत्नीचा भीषण अपघातात मृत्यू, आग्रा एक्स्प्रेस वेवर झाली दुर्घटना
 

प्रख्यात पान मसाला कंपनी केशरचे मालक हरिश मखिजा यांच्या पत्नीचा उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरिश माखिजा यांची पत्नी प्रिती माखिजा यांच्या कारचा टायर इटावाजवळ आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वे जवळ अचानक फुटला आणि हा अपघात झाला. अपघातग्रस्त कारमधून केशर पान मसाला कंपनीचे मालक हरिश माखिजा यांची पत्नी प्रिती माखिजा यांच्यासह कानपूरचे प्रसिद्ध मद्य व्यावसायिक तिलक राज शर्मा यांची पत्नी आणि ड्रायव्हर प्रवास करत होते. अपघातात प्रिती माखिजा यांचा मृत्यू झाला.

तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातातबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार हरिश माखिजा आणि तिलक राज शर्मा हे त्यांच्या कुटुंबीयांसह एका खासगी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आग्रा येथे जात होते. त्यांची कार ७९ मैनपूरीमधील करहल टोलनाक्याजवळ आली असताना अचानक कारचा टायर फुटला आणि ती उलटली. 

मृत प्रिती माखिजा यांचा मुलगा पीयूष माखिजा याने सांगितले की, अपघात झाला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. तसेच कारचा वेगही अधिक होता. याचदरम्यान, अचानक टायर फुटला आणि गाडी उलटून त्यात माझ्या आईचा मृत्यू झाला. तसेच आणखी एक महिलाही या अपघातात जखमी झाली आहे.

प्रसारमाध्यमांमधून समोर येत असलेल्या वृत्तानुसार लँडमार्क हॉटेलचे चेअरमन दीपक कोठारी यांची पत्नी दीप्ती कोठारी या सुद्धा या अपघातात गंभीर जखणी झाल्या आहेत. त्यांनी सैफई येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. दीप्ती हिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रसारमाध्यमांमधून समोर येत असलेल्या वृत्तानुसार लँडमार्क हॉटेलचे चेअरमन दीपक कोठारी यांची पत्नी दीप्ती कोठारी या सुद्धा या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांनी सैफई येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. दीप्ती हिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.