Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्य उत्पादन शुल्क भवनला उत्कृष्ट इमारतीचा पुरस्कार बांधकामांच्या तीन श्रेणींमधील पुरस्कारांची घोषणा

राज्य उत्पादन शुल्क भवनला उत्कृष्ट इमारतीचा पुरस्कार बांधकामांच्या तीन श्रेणींमधील पुरस्कारांची घोषणा
 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट इमारत पुरस्कारासाठी यंदा बोरीबंदर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुख्यालय इमारतीची निवड करण्यात आली आहे. याशिवाय उत्कृष्ट पूल आणि उत्कृष्ट रस्ता या श्रेणीतील पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत.

बांधकाम विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबरला अभियंता दिन साजरा करून 'उत्कृष्ट अभियंता' या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. आता याच धर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकताच शासन निर्णय जाहीर झाला आहे. विभागांतर्गत अभियंत्यांचे विविध कामांमधील कौशल्य लक्षात घेऊन त्यांना वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

उत्कृष्ट पूल - नागपूर जिल्ह्यातील खापरी पाचगाव कुही आंभोरा ते भंडारा (रामा-३४७) रस्त्यावरील आंभोरा येथे वैनगंगा नदीवरील पूल.

उत्कृष्ट इमारत - बौरीबंदर येथील सीटीएस १४५०, १ अ/ १४५० या भूखंडावरील राज्य उत्पादन शुल्क विभागाची मुख्यालय इमारत.

उत्कृष्ट रस्ता पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक परिक्रमा मार्ग- मोरगाव देवस्थान सिद्धटेक रांजणगाव- श्रीक्षेत्र ओझर, श्रीक्षेत्र लेण्याद्री थेऊर.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.