लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यास सध्या असमर्थ; सगळे सोंग करता येतात,अजितदादांच्या भाषणावेळी महिला उठून निघाल्या
नांदेड :- नरसी इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवेश सोहळा बराच वेळ रंगला होता, कार्यक्रम रटाळ झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना महिलांनी खुर्च्या सोडून बाहेरचा रस्ता धरला. गेल्या अनेक दिवसांपासून महायुूतीची
गेमचेंजर लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 करा अशी मागणी होत आहे.
पण दरम्यान सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याचीही चर्चा असल्याने लाडक्या
बहिणींबाबत अजित दादा काय बोलतात हे ऐकण्यासाठी अनेक लाडक्या बहिणी आल्या
होत्या.
मात्र, मी 2100 देणार आहे. मी नाही
म्हणालो नाही. मला योजना सुरू ठेवायची आहे. पण मलाही हिशोब मांडावे लागतात.
सगळी सोंग करता येतात पैशाचे नाही असे अजित पवार यांनी नांदेडच्या सभेत
वक्तव्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवेश सोहळा बराच वेळ रंगला
होता, कार्यक्रम रटाळ झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू
असताना महिलांनी खुर्च्या सोडून निघून गेल्याचं चित्र दिसलं.
लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यास दादांनी असमर्थता दर्शवल्याने महिला नाराज झाल्या अशी चर्चा कार्यक्रम स्थळी रंगली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात मात्र येत्या काळात 2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिल्यानंतर या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार वाढल्याची चर्चा होती.मात्र, लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे वाढवून देण्यास अजितदादांची असमर्थता दिसल्याने अनेक जणींनी बाहेर जाणं पसंत केलं. भाषणापूर्वी भरलेल्या खूर्च्या रिकाम्या दिसायला लागल्याने लाडक्या बहिणी उठून गेल्याची चर्चा सुरु झाली. सगळी सोंग करता येतात पैशांची सोंग करता येत नाहीत. मला दिलेली योजना चालू ठेवायची आहे. सरकारला चालू ठेवायचे आहे त्यामुळे यासाठी आम्ही नवीन पर्याय काढत आहोत. असे अजित पवार नांदेडच्या कार्यक्रमात म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.