Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

50 कोटी रुपयांचा कुत्रा खरेदी करणाऱ्याच्या घरी धडकली ईडी, तपासात झाले सर्वच उघड

50 कोटी रुपयांचा कुत्रा खरेदी करणाऱ्याच्या घरी धडकली ईडी, तपासात झाले सर्वच उघड
 

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका व्यक्तीने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत तब्बल 50 कोटी रुपयांचा कुत्रा खरेदी केल्याचा दावा केला होता. पण ही पोस्ट पाहून त्याच्या घरी थेट सक्तवसुली संचलनालयचे (ED) अधिकारी येऊन धडकल्यानंतर त्याला घाम फुटला. ईडीच्या टीमने त्याच्याकडे या व्यवहाराची चौकशी केल्यावर हा मामला दुसराच असल्याचे उघड झाले.


एस. सतीश या श्वानप्रेमीने सोशल मीडियावर एका कुत्र्याचा शेअर करून हा दुर्मीळ जातीचा आणि जगातील सर्वात महाग कुत्रा मी 50 कोटी रुपयांना खरेदी केला असल्याची माहिती दिली होती. हा कुत्रा म्हणजे कॉकेशियन शेफर्ड आणि वुल्फचा 'क्रॉस-ब्रीड' असल्याचे त्याने म्हटले होते. त्याचा हा दावा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. सोशल मीडियावरची ही पोस्ट पाहून ईडीच्या पथकाने फेमाचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून 51 वर्षीय एस. सतीश याच्या घरावर गुरुवारी सकाळी छापा टाकला.
 
कुत्रा खरेदी व्यवहारात सतीशने 50 कोटी रुपये कसे दिले, याची माहिती ईडी घेत होती. सतीशच्या बँक खात्याची तपासणी केली असता त्याच्या खात्यातून असा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे ईडीच्या पथकाला आढळले. अशा परिस्थितीत, हवाला मार्गाने पैसा देऊन हा सौदा करण्यात आला असल्याचा संशय ईडी अधिकाऱ्यांना आला. त्यामुळे सतीशला समोर बसवून चौकशी केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.