Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मविआकडून अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्यानी ठेवली 'ही' अट

मविआकडून अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्यानी ठेवली 'ही' अट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची  मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा अजूनही अपूर्ण आहे. अजितदादांनीही अनेकदा ही इच्छा बोलून दाखवली आहे. आताही दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा व्यक्त केली होती.

मलाही अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठं जमतंय असे अजित पवार म्हणाले होते. यानंतर त्यांनी या वक्तव्यावर सारवासारवही केली होती. परंतु, यावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी तर अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफरच देऊन टाकली आहे.

रत्नागिरी येथे आज विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावर बोलताना विनायक राऊत यांनी अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रि‍पदाची ऑफर दिली. राऊत म्हणाले, अजित पवार यांनी महाविकास आघाडीत यावं त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. एकनाथ शिंदे आणि भाजपात दूरी वाढत असून शिंदेंना नैराश्य आलं आहे असा खोचक टोला विनायक राऊत यांनी लगावला.


मी गंमतीने म्हटलो, माझे शब्द मागे घेतो; मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर अजित पवारांचा युटर्न

दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी साद घातल्यानंतर मनसे आणि शिवसेना (उबाठा) युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या अस्तित्वापुढे आमचे वाद, भांडणं या गोष्टी क्षुल्लक आहेत असे राज ठाकरे म्हणाले होते. यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. या घडामोडींवर विनायक राऊत यांनी भाष्य केले. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे असे राऊत म्हणाले.

यानंतर त्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी  हल्ल्यावरही प्रतिक्रिया दिली. पहलगाममध्ये अतिरेकी अचानक आले नाहीत. पहलगाम हल्ला हा मोदी सरकारचे अपयश आहे. सध्या युद्धाचं वातावरण तयार केलं जात आहे. पक्षाची प्रसिद्धी केली जात आहे. दुसरीकडे लोककल्याणाच्या अनेक योजना बंद पडल्या आहेत अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.