Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुमच्या पत्नीला तुम्ही सिंदूर का देत नाही ? ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधानांना बोचरा सवाल

तुमच्या पत्नीला तुम्ही सिंदूर का देत नाही ? ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधानांना बोचरा सवाल
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये भाषण करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. या टीकेला उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली. यावेळी ऑपरेशन सिंदूरवर बोलताना ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक बोचरा सवाल केला आहे. ”सिंदूर हा प्रत्येक महिलेचा सन्मान असतो. प्रत्येक महिलेला तिचा पती सिंदूर लावत असतो देत असतो. पण तुमच्या पत्नीला तुम्ही सिंदूर का देत नाही ? असा बोचला सवाल ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी मोदींना एक आव्हान देखील दिलं. जर तुम्हाला ऑपरेशन पश्चिम बंगाल करायचं असेल तर उद्या निवडणूका जाहीर करा. आम्ही तयार आहोत. बंगाल तयार आहे, असे आवाहन ममता दिदींनी दिले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ऑपरेशन सिंदूरचे राजकारण करत आहेत अशी टीका देखील केली. 
 
”ऑपरेशन सिंदूर हे नाव राजकीय हेतूने देण्यात आलेले आहेत. ते विरोधकांना सांगतात की ऑपरेशन सिंदूरचे राजकारण करू नका आणि स्वत: मात्र त्यावरून राजकीय होळी खेळतात, असा हल्लाबोल त्यांनी केला. ”विरोधी पक्षाचे खासदार परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि पंतप्रधान देशात राहून राज्यांची बदनामी करत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे’, अशी टीका त्यांनी केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.