कूलिंग चार्जेसच्या नावाखाली दुकानदार MRP पेक्षा जास्त पैसे घेत असेल तर 'येथे' करा तक्रार
मुंबईसहीत राज्यातील अनेक शहरांमधील पारा 40 अंशांच्या वर पोहोचला आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच शीतपेयांची मागणीही वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. केवळ शीतपेयच नाही तर थंड पाण्याच्या बाटल्यांचा खपही वाढल्याचं दिसत आहे.
मात्र अनेक दुकानदार हे प्रत्यक्ष एमआरपी म्हणजेच विक्रीची सर्वाधिक रक्कम आकारण्याबरोबरच प्रत्येक प्रोडक्टमागे काही रुपये अधिक आकारतात. याबद्दल जाब विचारल्यास अनेकदा हे कूलिंग चार्जेस असल्याचा दावा विक्रेत्यांकडून केला जातो. मात्र अशाप्रकारे अतिरिक्त पैसे आकारणे हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे.
कूलिंग चार्जेसच्या नावाखाली अतिरिक्त पैसे
अनेक विक्रेते नियमांना बगल देत सर्रासपणे कूलिंग चार्जेसच्या नावाखाली पैसे आकारतात. कूलिंग चार्जेसच्या नावाखाली जास्त पैसे घेतल्याच्या अनेक तक्रारी रोज नोंदवल्या जातात. मात्र अशा तक्रारी कुठे कराव्यात याची बहुतांश ग्राहकांना कल्पना नसते. कोणताही विक्रेता एमआरपीपेक्षा अधिक पैसे आकारत असेल किंवा मागणी करत असल्याच त्याची तक्रार ग्राहक मंचाकडे करता येते. नियमांनुसार केवळ हॉटेलमध्ये शीतपेय आणि थंड पाण्याच्या बाटलीमागे अतिरिक्त पैसे आकारण्याची मूभा आहे. या ठिकाणी ग्राहकांना केवळ पेय अथवा पाणी न देता त्याचसोबत इतरही सेवा दिल्या जात असल्याने ही मूभा देण्यात आली आहे. मात्र हल्ली केवळ पाणी किंवा शीतपेय विकणारे जनरल स्टोअर्स, किरणामालाच्या दुकानावरही हीच सबब देऊन कूलिंग चार्जेसच्या नावाखाली अतिरिक्त पैसे आकारले जातात. असं करणं ही ग्राहकांची फसवणूक असून त्याविरुद्ध ग्राहकांना दाद मागण्याचा हक्क आहे.
ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष काय म्हणतात?
शीपपेय आणि थंड पाण्याच्या बाटल्यांची विक्री करताना एमआरपी किंमतीनुसारच करणं बंधनकारक आहे. म्हणूनच ग्राहकांनी अशावेळी अतिरिक्त शुल्क देणं चुकीचं ठरतं. ग्राहकांची फसवणूक करुन कूलिंग चार्जेसच्या नावाखाली अतिरिक्त पैसे आकारले जाणं चुकीचं आहे. मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड शिरीष देशपांडेंनी शीतपेयांसाठी अतिरिक्त पैसे मागण्याचा हक्क विक्रेत्यांना नसल्याचं म्हटलं आहे. ग्राहांना ग्राहक जिल्हा तक्रार मंचाकडे अशा अतिरिक्त शुल्क आकारणीविरोधात तक्रार करता येते असंही देशपांडेंनी सांगितलं.
मुंबई ग्राहक पंचायतीचा संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी
फोन नंबर
प्रोडक्टच्या दर्जाबद्दल तक्रार असेल तर या क्रमांकावर फोन करा - 022 47508544
खात्याशीसंबंधित तक्रार असेल तर या क्रमांकावर फोन करा - 022 47508543, 8828311107
रिफंड आणि रिकव्हरीसंदर्भात तक्रार असेल तर या क्रमांकावर फोन करा - 8828311109
वेबसाईट आणि सदस्यत्वासंदर्भातील तक्रार असेल तर तर या क्रमांकावर फोन करा - 8369887939
ईमेल आयडी
प्रोडक्टच्या दर्जाबद्दल तक्रार असेल तर ईमेल आयडी - mgpvitaran@yahoo.co.in
खात्याशीसंबंधित तक्रार असेल तर ईमेल आयडी- mgpvitaran2020@gmail.com
रिफंड आणि रिकव्हरीसंदर्भात तक्रार असेल तर ईमेल आयडी- mgpvitaranrr@gmail.com
सदस्यासंदर्भातील तक्रार असेल तर ईमेल आयडी- membervitaran@gmail.com
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.