रजनीकांत-कमल हसनची प्रसिद्ध हिरोईन, नंतर वेश्याव्यवसाय करू लागली, AIDS झाला आणि. असं काय घडलं तिच्याबाबत?
झगमगत्या विश्वात कधी काय होईल याची काहीच कल्पना नसते… आता प्रसिद्धी झोतात असलेल्या सेलिब्रिटीसोबत पुढे काही होईल हे सांगणं फार कठीण आहे. विशेषतः अभिनेत्रींबद्दल काहीही बोलणं फार कठीण आहे. झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना पोटाची भूक भागवण्यासाठी नको तो व्यवसाय करण्याची वेळ आली. असंच काही अभिनेते रजनीकांत आणि कमल हसन यांच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील झालं. करीयरच्या सुरुवातील अभिनेत्री यशाच्या शिखरावर होती. पणनंतर सर्वकाही होत्याचं नव्हतं झालं. वेश्याव्यवसायामुळे अभिनेत्रीला AIDS झाला आणि शेवटच्या क्षणी तिच्यासोबत कोणीच नव्हतं.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री निशा नूर होती. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त निशा नूर हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा रंगली आहे. पण ही चर्चा काही दिवसांनंतर अभिनेत्रीच्या वेश्याव्यवसायाकडे वळली आणि त्यानंतर तिच्या मृत्यूकडे.
अभिनेत्रीने तमिळ आणि मल्याळमभाषेत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. पण एक वेळ अशी आली की तिला सिनेमांमध्ये काम मिळणं बंद झालं आणि अभिनेत्रीने चुकीच्या मार्ग स्वीकारला. जसजशी निशाची प्रेक्षकांमधील क्रेझ कमी होत गेली, तसतशी ती बेरोजगार झाली. कारण निशाला मुख्य अभिनेत्रीची भूमिका देऊन कोणत्याही दिग्दर्शकाला धोका पत्करायचा नव्हता.
सिनेमांमध्ये काम मिळणं बंद झाल्यानंतर निशा देहव्यापारात म्हणजेच वेश्याव्यवसायात बळजबरीने अडकली आणि इथूनच तिच्या आयुष्यातील वाईट टप्पा सुरू झाला. सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगू लाहली. अभिनेत्रीला फक्त बदनामीच नाही तर, गंभीर आजाराचा देखील सामना करावा लागला. एड्ससारखा भयंकर आजार अभिनेत्रीला झाला.पूर्वी कायम चाहत्यांच्या घोळक्यात राहणारी निशा शेवटच्या क्षणी मात्र एकटीच पडली. शेवटच्या क्षणी निशा हिच्याकडे कोणीच नव्हतं. रिपोर्टनुसार, 2007 मध्ये निशा दर्ग्याच्या बाहेर अत्यंत वाईट अवस्थेत सापडली होती. तिची ओळख पटणं देखील कठीण झालं होतं. अभिनेत्रीचं शरीर अशक्त झालं होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे अखेरच्या क्षणी अभिनेत्रीच्या अंगावर किडे रेंगाळू लागलं. तपसणी झाल्यानंतर अभिनेत्रीला एड्स झाल्याचं निष्पन्न झालं. आजारामुळे अभिनेत्रीचं 23 एप्रिल 2007 निधन झालं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.