स्मशानभूमीत कारमध्ये भाजप नेत्याची रासलीला; विवाहित महिलेसोबत संबंध ठेवताना गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं
महिनाभरापूर्वी नेते मनोहरलाल धाकड यांचा हायवेवर आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये आणखी एका भाजप नेत्याचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भाजप नेत्याला स्मशानभूमीत विवाहित महिलेसोबत रासलीला करताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. याचा व्हिडिओ शूट करून गावकऱ्यांनी समाजमाध्यमांमध्ये व्हायरलही केला आहे. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली.
या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बिजेपी नेता राहुल बाल्मिकी अर्धनग्न अवस्थेत दिसत असून, गावकऱ्यांना त्यांना रंगेहाथ पकडताच त्यांची माफी मागायला सुरूवात केली. त्यांच्यासोबत एक विवाहित महिला देखील आहे. ती महिला देखील ओढणीने चेहरा लपवताना दिसत आहे.
राहुल बाल्मिकी आधी स्मशानभूमीतील झाडाझुडपात आपली कार पार्क करतात. त्यांच्यासोबत एक विवाहित महिला देखील आहे. तिच्यासोबत नेत्याची रासलीला सुरू झाली. तेथून जात असताना काही गावकऱ्यांना संशय आला. त्यांनी झाडाझुडपात जाऊन पाहिलं. तर कारच्या आत नेते अर्धनग्न अवस्थेत होते. गावकऱ्याने कारची काच उघडण्यास सांगितली. नंतर व्हिडिओ शूट केला.दरम्यान, कारमधून उतरून राहुल यांनी गावकऱ्यांची माफी मागण्यास सुरूवात केली. 'दादा पाया पडतो, पण व्हिडिओ शूट करू नका', असं म्हणत व्हिडिओ शूट न करण्यास विनंती केली. सोबत असलेली विवाहित महिला ओढणीने तोंड लपवताना दिसत आहे. हा व्हिडिओ शूट करून सोशल माध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आला. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून राहुल बाल्मिकी फरार आहेत. भाजप पक्षाने राहुल बाल्मिकी यांच्यावर अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा मंत्र्यांची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, व्हिडिओ समोर आल्यानंतरही शिकारपूर पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. दरम्यान, राहुल यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.