Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जनसुराज्य'च्या मुंबई कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

जनसुराज्य'च्या मुंबई कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
 

मुंबई :  विधानभवनात जनसुराज्य शक्ती , पक्षाला स्वतंत्र कार्यालय देण्यात आले असून या कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी वाटचालीचा आढावा घेतला. महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून काम करताना विधायक विकासाला पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून विनय कोरे यांनी त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या या कार्यालयातून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबरोबरच विकासाची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठीचे कार्य जोमाने करत राहू.


संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार धैर्यशिल माने, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदाराह विश्वजित कदम, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार डॉ. अशोकराव माने उपस्थित होते. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने यांनी आभार मानले.
 

 
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.