Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! अमित शहांसमोर एकनाथ शिंदेंकडून पुण्यात जय गुजरातचा नारा!

Breaking News! अमित शहांसमोर एकनाथ शिंदेंकडून पुण्यात जय गुजरातचा नारा!


पुणे:  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात जय गुजरात चा नारा दिलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत कोंडवा येथे झालेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते.

त्यावेळी त्यांनी भाषणात अमित शहांचं तोंडभरुन कौतुक केलं. भाषणाचा समारोप करताना त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशा घोषणा दिल्या. शिंदेंनी दिलेल्या जय गुजरात घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाषण संपवताना शिंदे जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणाले. यानंतर ते क्षणभर थांबले. यानंतर त्यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली. अगोदरच महाराष्ट्र मध्ये हिंदी व मराठी मराठीचा वाद चालू असताना शिंदे यांनी विरोधकांना टीका करण्याची आयतीच संधी दिली आहे .

भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी ‘जय महाराष्ट्र, जय हिंद आणि जय गुजरात’ अशी घोषणा दिली. यामुळे आता वादाला तोंड फुटले आहे. राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिल्याने वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या या गुजरातच्या उल्लेखावरुन प्रचंड मोठा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणामध्ये म्हणाले की, आजचा दिवस संपूर्ण गुजरात समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे. याठिकाणी मी भगत येत होतो. येथे काहीही कमी नाही. तुम्ही सगळे लक्ष्मीपुत्र आहात. पैसे कमी पडण्याची गोष्टच नाही. त्यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण झाले. ज्या कामांचे भूमिपूजन हे पंतप्रधान मोदी करतात ते काम लवकर पूर्ण होते, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.


या कार्यक्रमात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचीही भाषणे झाली. देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांनी आपल्या भाषणात थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची महती कथन केली. अमित शाह या  कार्यक्रमाचे आकर्षण केंद्र असले तरी हा कार्यक्रम संपल्यानंतर एकनाथ शिंदे हेच चर्चेचा विषय ठरले. एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी 'जय गुजरात' का म्हटले, हा एकच प्रश्न सर्वतोमुखी होता. एरवी एकनाथ शिंदे हे आपल्या भाषणाचा शेवट असा करत नाहीत. मग नेमके आजच एकनाथ शिंदे यांना 'जय गुजरात' बोलण्याची बुद्धी कशी सुचली, याविषयी राजकीय वर्तुळाच चर्चा रंगल्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.