'जय गुजरात' घोषणेमुळे राजकीय वातावरण तापले; Eknath Shinde यांच्यावर विरोधकांचा हल्लाबोल
पुण्यात कोंढवा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी "जय गुजरात" अशी घोषणा करताच राजकीय खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते आणि शिंदे यांनी त्यांचे नेहमीप्रमाणे कौतुक करत भरपूर विशेषणांचा वापर केला.
मात्र भाषणाच्या शेवटी "जय हिंद, जय महाराष्ट्र" म्हटल्यावर काही क्षणांतच ते पुन्हा माईकवर येऊन "जय गुजरात" म्हणाले, आणि तेव्हापासून राजकीय वादंगाला तोंड फुटले आहे.
या विधानावरून ठाकरे गटाची नेते सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी म्हटले की, शिंदे यांनी आधीच महाराष्ट्राच्या अस्मितेला दगा दिला असून मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात दिल्लीशी निष्ठा दाखवली आहे. त्यांच्या मते, शिंदे यांना अजित पवारांच्या राजकीय पकडीपुढे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी पुन्हा एकदा भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाशी जवळीक दाखवावी लागत आहे.
तसेच त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री पद भूषवणारी व्यक्ती "जय गुजरात" म्हणते, हे दुर्दैव आहे. आज मराठी अस्मिता संकटात आहे आणि अशा वेळी मराठी जनतेने 'नो मराठी, नो बिझनेस' आणि 'नो मराठी, नो वोटिंग' असे जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनीही शिंदे यांना लक्ष्य करत "केम छो, एकनाथ शिंदे साहेब?" असा टोमणा मारला आहे. त्यांनी थेटपणे टीका करत "विनाशकाले विपरीत बुद्धी" असे म्हणत शिंदे यांचं वर्तन एका दिशाहीन नेतृत्वाचं उदाहरण असल्याचे सूचित केले. शिवसेना ही मराठी माणसासाठी निर्माण झालेली ताकद होती आणि आज त्याच पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडून 'जय गुजरात' ऐकणं म्हणजे अस्मितेवर आघात असल्याचं ते म्हणाले. सध्या महाराष्ट्रात मराठी विरुद्ध अमराठी हा विषय तापत असतानाच 'जय गुजरात' घोषणेने राजकीय वातावरण अजूनच धगधगायला सुरुवात झाली आहे.
पुण्यात कोंढवा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी "जय गुजरात" अशी घोषणा करताच राजकीय खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते आणि शिंदे यांनी त्यांचे नेहमीप्रमाणे कौतुक करत भरपूर विशेषणांचा वापर केला. मात्र भाषणाच्या शेवटी "जय हिंद, जय महाराष्ट्र" म्हटल्यावर काही क्षणांतच ते पुन्हा माईकवर येऊन "जय गुजरात" म्हणाले, आणि तेव्हापासून राजकीय वादंगाला तोंड फुटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.