Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे :- पोलिस उपनिरीक्षकाची हप्तेखोरी, हॉटेल व्यवसायिकाला धमकावत पैसे उकळले; CCTV VIDEO व्हायरल

पुणे :- पोलिस उपनिरीक्षकाची हप्तेखोरी, हॉटेल व्यवसायिकाला धमकावत पैसे उकळले; CCTV VIDEO व्हायरल
 

पुण्यातील खराडी पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाने हॉटेल चालकाकडून कारवाईच्या धाकाने पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. खरं तर नियमानुसार हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री दिड वाजेपर्यंत परवानगी आहे. असे असताना देखील हे पोलिस उपनिरीक्षक रात्री सव्वा बारा वाजता हॉटेलमध्ये घुसून जेवण करत असलेल्या ग्राहकाचे व्हिडिओ चित्रीकरण करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेल व्यावसायिकाला पोलिस ठाण्यात बोलावून तुम्ही माझे काम केले तर मी तुमचे काम करतो असे म्हणत पैशाची मागणी करून रात्री साडेआठ वाजता ते स्वीकारतात.

दरम्यान यांबाबत खराडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी सांगितले की, आस्थापना बंद करण्याचे निर्धारीत वेळेचे नियम आहेत. हॉटेल रेस्टॉरंटला दिड वाजेपर्यंत परवानगी आहे. जे अधिकारी मिकाची क्लबमध्ये रात्री सव्वा बारा वाजता गेल्याचे समजते आहे. त्यांना आम्ही हॉटेल बंद करण्याबाबत सांगितले नव्हते. या प्रकाराची आम्ही माहिती घेतो.

तर दुसरीकडे पोलिस आयुक्तांनी हॉटेल संदर्भात काढलेली नियमावली आणि शहरातील आस्थापनांचा कालावधी याचा कदाचीत विसर पडला असावा. आयुक्त साहेबांनी काढलेली नियमावली सांगते, मनोरंजनासाठी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकांना त्रास नको अपवादात्मक परिस्थिती सोडता, पोलिस सतत आस्थापनामध्ये प्रवेश करणार नाहीत. नियमभंग केल्याची कारवाई करायचे झाल्यास पोलिस मॅनेजरला बाहेर बोलावून घेतील. त्यानंंतर दीड वाजताची आस्थापना बंद करण्याची वेळ झाल्यानंतर करवाई करतील. त्याचबरोबर आस्थापनांना बंद करण्याचा कालावधी याचे स्पष्ट निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावलीत दिले आहेत. 
 
फौजदारसाहेब हॉटेलमध्ये शिरून रात्री सव्वा बारा वाजताच हॉटेल बंद करण्यास सांगत असलेले आणि मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. तसेच त्यांनी दुसर्‍या दिवशी हॉटेल मॅनेजर आणि मालकाला देखील फोन केल्याचे समोर आले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिकांकडून जर नियमांचे उल्लंघन होत असलेल तर त्यांच्यावर कारवाई होणे जरजेचेच आहे. परंतू केवळ कारवाई करण्याच्या धाकाने जर काही पोलिस अधिकारी आपले आर्थिक हेतू साध्य करून पाहत असतील तर हे नक्कीच पोलिसांच्या प्रतिमेला शोभणारे नसल्याचे बोलले जाते. 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.