Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल
 

ती सध्या तिच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे. तर नील नितीन मुकेश हा श्रीमंत बिझनेसमनच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी दिव्याला प्रत्यक्षात झोपडपट्टीत राहावं लागलं. दिव्या खोसला ही टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी आहे. भूषण कुमार यांच्या कंपनीची नेटवर्थ तब्बल १० हजार कोटी रुपये इतक आहे. परंतु अभिनयासाठी तसंच चित्रपटासाठी ती अक्षरशः गटाराशेजारी असलेल्या झोपडीत राहाली.

दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी दिव्याला वास्तव जाणवण्यासाठी एक महिना झोपडपट्टीत राहायला सांगितलं. तसंच तिला तिला झाडू, फरशी पुसण्यासह पडेल ते असं सगळं घरकामही करायला लावलं. एका सीनसाठी तर तिला गटाराशेजारी उभं केलं. त्यावेळी ती जवळजवळ नाल्यात पडणार होती. असं ती एका मुलाखतीत म्हणाली. 
 
'एक चतुर नार' या चित्रपटाचे शूटिंग लखनऊच्या बादशाह नगर झोपडपट्टीत झालय. दिव्या एक महिना राहिलेली झोपडी अगदी गटाराशेजारी होती. तिथे दुर्गंधीमुळे खूप त्रास व्हायचा. पण काही दिवसांत तिला त्याची सवय झाली. हा अनुभव सांगताना दिव्या हसली आणि म्हणाली 'मी करोडपती पतीची बायक असले तरी कलाकार म्हणून वास्तव दाखवण्यासाठी काहीही करावं लागतं.'



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.