Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वारगेट बलात्कार प्रकरणात निलंबित अधिकारी पुन्हा सेवेत? सरनाईकांचा संताप! थेट घेतला मोठा निर्णय

स्वारगेट बलात्कार प्रकरणात निलंबित अधिकारी पुन्हा सेवेत? सरनाईकांचा संताप! थेट घेतला मोठा निर्णय
 

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज अचानकपणे शिवाजीनगर आणि स्वारगेट एसटी स्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानकातील सोयी सुविधांचा आढावा घेतला. तसेच स्थानकावरील शौचालयाच्या स्वच्छतेचा पाहणी केली. यावेळी अस्वच्छता पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

काही महिन्यांपूर्वी स्वारगेट एसटी स्थानकात बलात्काराची घटना घडली होती. या घटनेने सबंध महाराष्ट्रात खळबळ उडाली. या घटनेमुळे एकूणच एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. प्रकरणात सरकारकडून चौकशी समिती देखील स्थापन करण्यात आली होती. या चौकशी समितीच्या अहवालानंतर स्वारगेट एसटी स्थानकातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते.

मात्र आजच्या मंत्र्यांच्या दौऱ्या दरम्यान हे दोन्ही अधिकारी पहिल्याच पदांवर पुन्हा कार्यरत असल्याचं मंत्र्यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला. तसेच या दोन्ही अधिकाऱ्यांना पुन्हा याच पदावर त्याच ठिकाणी कसं रुजू करून घेण्यात आलं असा सवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना केला. तसेच या दोन्ही अधिकाऱ्यांबाबत तातडीने आदेश देखील दिले. याबाबत प्रताप सरनाईक म्हणाले, स्वारगेटची दुर्दैवी घटना घडल्यानंतर आम्ही सभागृहात सांगितले होते की या प्रकरणातील दोषींवर आम्ही तातडीने कारवाई करून. त्यानुसार त्यांचं निलंबन देखील करण्यात आलं होतं.
 
मात्र 90 दिवसानंतर आता त्यांना पुन्हा कामावरती रुजू करून घेण्यात आला आहे. या प्रकरणात त्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती आणि ते अधिकारी त्यात दोषीही आढळले होते. असे असताना देखील सीनियर डेपो मॅनेजर आणि जूनियर डेपो मॅनेजर यांना त्याच पदावरती पुन्हा रुजू करून घेण्यात आला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांबाबत कर्मचाऱ्यांसह इतरांच्याही मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने या दोन्ही अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी रुजू करून घेण्यात आला असेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे.

सभागृहात या मुद्द्यावर जेव्हा विरोधक आणि आमच्या सत्ताधारी पक्षातील इतर सहकाऱ्यांनी याबाबत प्रश्न विचारले असता आम्ही दोषींवरती कारवाई केली असल्याचं सभागृहात सांगितलं त्यानंतर खालील प्रशासनाने त्याबाबत कारवाई करणे अपेक्षित असताना आज या ठिकाणी वेगळं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली असून ज्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवल्यानंतर देखील याच ठिकाणी रुजू करून घेण्यात आलं आहे त्या अधिकाऱ्यांची आजच्या आज बदली करण्याच्या आदेश दिले असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.