Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"बाबरीचे बांधकामच..."; धनंजय चंद्रचूड यांच्या विधानावरून गोंधळ; स्पष्टीकरण देत म्हणाले....

"बाबरीचे बांधकामच..."; धनंजय चंद्रचूड यांच्या विधानावरून गोंधळ; स्पष्टीकरण देत म्हणाले....
 

भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टाच्या २०१९ च्या अयोध्या निकालाबाबत केलेल्या विधानामुळे एक नवा वाद निर्माण केला आहे. अयोध्या बाबरी मशीद- राम मंदिर वादावर धनंजय चंद्रचूड यांनी ऐतिहासिक निर्णय दिला होता. मात्र एका मुलाखतीमध्ये बोलताना धनंजय चंद्रचूड यांनी त्या जागी बाबरी मशिदीचे बांधकाम करणे खरेतर त्या जागेचे अपवित्रीकरण करणे होते असं म्हटलं होतं. माजी सरन्यायाधीशांनी केलेल्या या विधानावरुन वाद निर्माण झाल्यानंतर धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी गुरुवारी अयोध्या राम मंदिर प्रकरणात त्यांच्या वादग्रस्त विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी एका मुलाखतीत बाबरी मशिदीचे बांधकाम हे मूलभूतपणे अपवित्र कृत्य होते असे म्हटले होते, ज्यामुळे वाद निर्माण झाला. यावर स्पष्टीकरण देताना माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी माझे विधान चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे म्हटलं. मुलाखतीत चंद्रचूड यांना १९४९ मध्ये बाबरी मशिदीत रामलल्लाची मूर्ती बेकायदेशीरपणे ठेवली हे हिंदूंच्या विरोधात का गेले नाही? असं विचारलं होतं. त्यावर उत्तर देताना चंद्रचूड यांनी मशिदीचे बांधकाम अपवित्र कृत्य होते, असं म्हटलं. चंद्रचूड यांच्या विधानाने सोशल मीडियावर खळबळ उडाली.
 
इंडिया टुडेच्या मुलाखतीत धनंजय चंद्रचूड यांनी आता त्या विधानाचे स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर जे घडत आहे ते असे आहे की लोक उत्तराचा एक भाग उचलतात आणि दुसऱ्या भागाला जोडतात, ज्यामुळे संदर्भ पूर्णपणे काढून टाकला जातो, असं धनंजय चंद्रजूड म्हणाले. चंद्रचूड यांनी स्पष्ट केले की अयोध्या प्रकरणाचा निकाल हा श्रद्धेवर नाही तर पुराव्यावर आणि कायदेशीर तत्त्वांवर आधारित होता. "हा निकाल १,०४५ पानांचा होता कारण खटल्याची नोंद ३०,००० पेक्षा जास्त पानांपर्यंत पोहोचली होती. त्यावर टीका करणाऱ्यांपैकी बहुतेकांनी निकाल वाचलेला नाही. संपूर्ण कागदपत्र न वाचता सोशल मीडियावर तुमचे मत पोस्ट करणे सोपे आहे, निकालात पुरातत्वीय पुरावे आढळले की मशिदीखाली एक मंदिर होते, जे मशीद बांधण्यासाठी पाडण्यात आले होते," असंही धनंजय चंद्रचूड म्हणाले.
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.