Big Breaking! आयुष कोमकरच्या खुनाचा बदला? सहा गोळ्या झाडून कोंढव्यात गणेश काळेचा मर्डर
पुणे - कोंढवा परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात हा खून टोळीयुद्धातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृत तरुणाचे नाव गणेश काळे असे असून, तो कोंढवा परिसरात राहणारा आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश काळे शनिवारी दुपारी आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याला अडवून पिस्तुलातून सलग गोळ्या झाडल्या. या गोळीबारात काळे गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि काळेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळावरून पोलिसांनी काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. गणेश काळे हा यापूर्वी झालेल्या एका खून प्रकरणातील आरोपीचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या खुनामागे टोळीयुद्धाची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात आंदेकर टोळीने आयुष कोमकरवर गोळीबार केला होता, त्यात आयुषचा जागीच मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर नीलेश घायवळ टोळीतील सराईतांनी कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात आणखी एका तरुणावर गोळीबार केला होता. तसेच त्याच परिसरात एका तरुणावर कोयत्याने वार करून दहशत निर्माण करण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.