कर्मवीर पतसंस्थेकडे दीपावली धनवर्षा ठेव योजनेत ५० कोटीच्या ठेवी जमा चेअरमन श्रीमती भारती चोपडे यांची माहिती.
सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली या संस्थेमध्ये दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सभासदांच्या कडून ठेवी स्वीकारण्यात आल्या. ठेवीसाठी पाडव्याच्या मुहुर्तावर संस्थेच्या सर्व शाखा सुरु ठेवण्यात आल्या होत्या. पाडव्याच्या दिवशी संस्थेकडे ३५ कोटीहुन अधिक ठेवी जमा झाल्याची माहीती संस्थेचे चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी दिली.
एका दिवसामध्ये संस्थेकडे मोठ्या प्रमाणात ठेव जमा झाली याचे कारण म्हणजे सभासदांचा संस्थेवरील विश्वास व संस्थेने सभासदांच्यासाठी दिनांक १६/१०/२०२५ ते ३०/१०/२०२५ या कालावधीत वाढीव व्याजाची ठेव योजना जाहीर केली, त्याचा लाभ सभासदानी घेतला असल्याचे व या योजनेत रु.५० कोटीच्या ठेवी नव्याने जमा झाल्याचे व्हा. चेअरमन अॅड. एस.पी. मगदूम यांनी सांगितले.
संस्थेने सभासदांच्यासाठी दिपावलीनिमित्त वाढीव व्याजाची म्हणजे सर्व ठेवीदारांना ९.५० टक्के व जेष्ठ नागरीकां ना ९.७५ टक्के व्याजाची दिपावली धनवर्षा ठेव योजना सुरु केली होती. या योजनेस ठेवीदारांचा अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. संस्थेनेही या योजनेची जास्तीत जास्त जाहीरात केली. या वाढीव व्याज योजनेतून संस्थेने सभासदांना दिपावलीची भेट दिली आहे. संस्थेने ठेवलेले ठेव उद्दीष्ट देखील संस्थेने पुर्ण केले. संस्थेच्या ठेवी रु. १२५४ कोटी पर्यंत पोहोचल्या आहेत. यासाठी संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांनी केलेले नियोजन आणि त्यानुसार सर्व विभागीय अधिकारी, शाखाधिकारी व सेवकांनी ठेवीसाठी केलेले प्रयत्न महत्वाचे ठरले. त्याबद्दल सर्व विभागीय अधिकारी व शाखाधिकारी यांना चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्या हस्ते अभिनंदन सभेमध्ये पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सर्व सेवकांनी ते संस्थेसाठी सतत त्यांचे १०० टक्के योगदान देण्यार असल्याचे ठाम मत व्यक्त केले. कर्मवीर च्या सर्व टिमने ठेव संकलनासाठी चांगले प्रयत्न केले. संस्थेच्या प्रगतीबाबत सभासदांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.