Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुवाहटीची वारी करणाऱ्या शहाजी बापू पाटलांना कॅन्सर? मुख्यमंत्री फडणवीसांना केले भावनिक आवाहन

गुवाहटीची वारी करणाऱ्या शहाजी बापू पाटलांना कॅन्सर? मुख्यमंत्री फडणवीसांना केले भावनिक आवाहन


मुंबई : काय झाडी काय डोंगर अशा डायलॉगने गुवाहटीची वारी गाजवणारे शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील हे जोरदार चर्चेत आले. शहाजी बापू हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत राहतात. मात्र यावेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. तसेच माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्या आजाराबाबत वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून चिंता देखील व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाच्या शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत देखील मागितली आहे.

सांगोल्याचे माजी आमदार असलेल्या शहाजी बापू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मृत्यूच्या दारात असताना मी भाजपाच्या उमेदवाराला १५ हजारांच मताधिक्य दिलं. याचं फळ म्हणून मला सांगोल्यात एकटं पाडलं का? सांगोल्यात काय चाललं आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे समजत नाही का? असा प्रश्न केला आहे.
सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपाने शेतकरी कामगार पक्षाचे दीपक साळुंखे यांच्याशी आघाडी केली. मात्र सांगोल्यामध्ये दीपक साळुंखे आणि शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील हे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. राजकीय समीकरणे बदलल्यामुळे शहाजी बापू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना साद घातली.

शहाजी बापू पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा कुठला शब्द मोडला? हे त्यांनी मला सांगावं. १५ हजारांचा लीड आहे माझ्या तालुक्यात लोकसभेला, मोहिते पाटील घराण्यातल्या उमेदवार होता. मी निवडणूक प्रचार सोडून ऑपरेशन केलं असतं तर कॅन्सरपर्यंत आजार गेला नसता. आपले कर्तव्य आहे म्हणून जीवहीं पणाला लावला.” अशा शब्दांत शहाजी बापू पाटील यांनी महायुतीवरील आपली नाराजी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले की, “लोकसभा निवडणूक काळात तीन महिने मी साधा आजार लांबवला आणि आज साधा आजार गंभीर बनला असल्‌याचेही बापूंनी यावेळी सांगितले. असे असताना सांगोल्यात मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आक्षेप त्यांचा असून ज्याचे त्याचे कर्म ज्याच्या-त्याच्या सोबत असे म्हणत बापूंनी भाजपच्या धोरणावर सडकून टीका केली असल्‌याने आपण डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि भाजप उमेदवार रणजीत निंबाळकर यांना १५ हजारांचे लीड मिळवून दिले. यामुळे माझे डॉक्टरही माझ्यावर नाराज झाले आणि माझा आजार वेळीच उपचार न झाल्याने गंभीरपणाकडे गेला” असा आरोपही शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.