Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाकाहारी समजून चवीने खात असाल पण, मांसाहारी मानली जाते ही डाळ, साधूसंतही तोंड लावत नाहीत.

शाकाहारी समजून चवीने खात असाल पण, मांसाहारी मानली जाते ही डाळ, साधूसंतही तोंड लावत नाहीत.


भारतातील आहारात डाळीचे मोठे महत्वाचे स्थान आहे. शाकाहारी असो वा मांसाहारी प्रत्येकाने डाळींचा आस्वाद केव्हा ना केव्हा घेतलाच असेल. जगभरात अनेक डाळींचे प्रकार आढळतात. भारताचा विचार करता येथे पाच प्रमुख डाळी पिकतात. यात ( उडीद, चणे, मूग, मसूर आणि तूर ) या डाळींना मोठ्या चवीने खाल्ले जाते. परंतू तुम्हाला अशी डाळ माहिती आहे की जिला मांसाहारी मानले जाते. 

इतकेच काय साधूसंतही या डाळीला खात नाहीत. अनेकदा अनेक वस्तूंना आपण शाकाहारी समजत असतो. परंतू सनातन धर्मात काही पदार्थांना मांसाहारी मानले गेले आहे. यात आता मसूरच्या डाळीचा समावेश होतो. मसूर डाळीला हिंदू धर्मात मांसाहारी डाळ मानले गेले आहे. हे जरा ऐकायला विचित्र वाटेल. परंतू मसूर डाळीला असे मांसाहारी मानण्यामागे काय तर्क आहे, तो ऐकला तर तुम्हालाही आश्चर्य वाटल्यावाचून रहाणार नाही.



हिंदू धर्मात मांसाहारी का ठरली मसूर डाळ ?

मसूर डाळ अनेक शाकाहारींची फेव्हरेट डाळ म्हटली जात असली तिला मांसाहारी मानून तुमचा मूड खराब करण्याचा आमचा उद्देश नाही. परंतू या मागचे कारण सांगणे महत्वाचे आहे. हिंदू धर्मात मसूर डाळीला मांसाहारीच्या कॅटगरीत का ठेवले या मागचे कारण धार्मिक आहे. याचे कनेक्शन समुद्र मंथनाशी आहे. जेव्हा भगवान विष्णूंनी गुपचूपपणे अमृत पिणाऱ्या स्वरभानू या राक्षसाचा वध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विष्णूंनी या दैत्याचे धडापासून शीर वेगळे केले तरी तो मेला नाही. तो दोन वेगळ्या भागाने ‘राहु’ आणि ‘केतु’ असा प्रसिद्ध झाला. स्वरभानुच्या वधाच्या वेळी या राक्षसाचे रक्त पडले तेथे मसूरची डाळ उत्पन्न झाली.

मांसाहारी मानण्याची अनेक कारणे –
काही धार्मिक मान्यतेनुसार मसूर डाळीची उत्पत्ती कामधेनू गायीच्या रक्तापासून मानली जाते. त्यामुळे सनातनी धर्मानुसार मसूर डाळीला मांसाहारी मानले जाते. अर्थात विज्ञानाच्या आधारे मसूर डाळीचा मांसाहारी होण्याचा कोणताही पुरावा नाही. या डाळीला मांसाहारी मानण्यामागे आणखीही कारणे सांगितली जातात. आयुर्वेदात मसूर डाळीला तामसी गुणांची मानली गेली आहे. या डाळीच्या सेवनाने कामेच्छा, राग, आळस सारख्या भावना वाढतात. त्यामुळे धार्मिक मार्गावर चालणारे साधुसंत या डाळीचे सेवन करत नाहीत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.