सांगली : शहरातील शिवशंभो चौक येथील विवाहितेने सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. सुप्रिया आकाश करांडे (वय 21) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई बाळाबाई तानाजी नरळे यांनी तिच्या पतीसह तिघांविरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पती आकाश दुर्योधन करांडे, सासू शालन दुर्योधन करांडे आणि नणंद कविता विठ्ठल बाड (तिघेही रा. शिवशंभो चौक, सांगली) यांचा समावेश आहे. सुप्रिया यांचा आकाश याच्याशी विवाह झाला होता. परंतु विवाह झाल्यापासून आकाश हा घरी दारू पिऊन येत असे. त्यानंतर चारित्र्याच्या संशयातून सुप्रिया यांना मारहाण करीत असे.तसेच सासू आणि नणंद या दोघी सुप्रिया यांना वारंवार टोमणे मारणे, टोचून बोलणे, असा जाच करीत होते. या त्रासाला कंटाळून सुप्रिया यांनी दि. 18 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या तिघांच्या जाचाला कंटाळून सुप्रिया यांनी आत्महत्या केली, असे त्यांची आई बाळाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.